परभणीत प्लास्टिक कोटेड रस्त्याचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 01:01 AM2019-02-06T01:01:09+5:302019-02-06T01:01:39+5:30
काळ्या मातीमुळे वारंवार खचणाऱ्या रस्त्यांवर पर्याय म्हणून तालुक्यातील साडेगाव ते मांगणगाव हा ६.४ कि.मी.अंतराचा रस्ता जिओ टेक्सटाईल मटेरियल वापरुन तयार केला जात आहे. अशा पद्धतीने प्लास्टिक कोटेड रस्ता तयार करण्याची राज्यातील पहिलीच वेळ आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: काळ्या मातीमुळे वारंवार खचणाऱ्या रस्त्यांवर पर्याय म्हणून तालुक्यातील साडेगाव ते मांगणगाव हा ६.४ कि.मी.अंतराचा रस्ता जिओ टेक्सटाईल मटेरियल वापरुन तयार केला जात आहे. अशा पद्धतीने प्लास्टिक कोटेड रस्ता तयार करण्याची राज्यातील पहिलीच वेळ आहे.
साडेगाव ते मांगणगाव या भागातील जमीन काळ्या मातीची आहे. परिसरातून कालवा गेला असल्याने डांबरी रस्ता तयार केल्यानंतर पाण्यामुळे काही काळातच हा रस्ता खड्डेमय होतो, अनेक ठिकाणी खचला जातो. वारंवार रस्ता करुनही गावांसाठी चांगला रस्ता उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण होत होती. यावर पर्याय काढण्यासाठी प्लास्टिक कोटेडच्या सहाय्याने रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागामध्ये प्रथमच हे तंत्रज्ञान वापरुन रस्त्याची निर्मिती केली जात आहे. पंतप्रधान ग्राम सडक विभागातील रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट या शाखेच्या वतीने हा रस्ता तयार केला जात आहे. मंगळवारी आ. राहुल पाटील यांनी रस्त्याची पाहणी केली. मांगणगाव ते साडेगाव या ६.४ अंतरासाठी ४.९८ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. प्लास्टिक कोटेडचे नवीन तंत्रज्ञान वापरुन रस्ता बनविल्यानंतर तो खचणार नाही आणि अधिक काळापर्यंत रस्त्याचे आयुष्यमान वाढेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. साडेगाव ते परभणी हे ३० कि.मी.चे अंतर असून नागरिकांना परभणी येथे वळसा घालून यावे लागत असे. साडेगाव ते मांगणगाव रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याने हे अंतर १७ कि.मी.पर्यंत कमी होणार आहे.
असा होणार रस्ता
४साडेगाव ते मांगणगाव हा रस्ता प्लास्टिक कोटेडच्या सहाय्याने तयार केला जात आहे. सुरुवातीला मुरुमाचा थर टाकला जात असून त्यावर जिओ टेक्सटाईल मटेरियल वापरले जात आहे. या मटेरियलवर पुन्हा मुरुमाचा थर नंतर गिट्टीचे दोन थर आणि त्यानंतर डांबरीकरण केले जाणार आहे. ४५ से.मी.पर्यंत जाडीचा हा रस्ता होणार असल्याची माहिती अभियंता सचिन पडुळे यांनी दिली.
४कचºयातून निघणाºया प्लास्टिकचा वापर तांत्रिक प्रक्रिया करून या कामासाठी वापर केला जातो. प्लास्टिक कचºयापासून बनलेल्या रस्त्यात पाणी कमी प्रमाणात झिरपते. या विभागाचे तज्ज्ञ सतीश शुक्ला यांच्या मतानुसार, तांत्रिक प्रक्रिया केलेला प्लास्टिकचा कचरा हा उत्कृष्ट राहिलेला आहे. या तंत्रज्ञानात प्लास्टिकबरोबर गिट्टीचा चुरा मिसळला जातो. ज्यामुळे रस्त्यावर एक विशिष्ट प्रकारचा लेअर तयार होतो. ज्यामुळे पाणी रस्त्यावर थांबू देत नाही. पाणी मुरत नसल्यामुळे या रस्त्याचे आयुर्मानही वाढते.