कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय, काळजी न घेतल्यास होऊ शकते इजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:22 AM2021-08-28T04:22:27+5:302021-08-28T04:22:27+5:30
सध्या मोबाइलचा वाढलेला अतिवापर तसेच शहरातील वाढत्या धुळीमुळे अनेकांना डोळ्याचे आजार होत आहेत. हे प्रमाण सर्वच वयोगटांमध्ये कमी ...
सध्या मोबाइलचा वाढलेला अतिवापर तसेच शहरातील वाढत्या धुळीमुळे अनेकांना डोळ्याचे आजार होत आहेत. हे प्रमाण सर्वच वयोगटांमध्ये कमी अधिक आहे. यामुळे काही जणांना चष्माही लागला आहे. यात तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, यातील काही तरुणांनी चष्मा वापरण्यापेक्षा कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्यावर भर दिला आहे. यामुळे कॉन्टॅक्ट लेन्सची मागणी वाढल्याचे दिसून येते.
चष्म्याला करा बाय बाय
कोणत्याही वयोगटातील नागरिकांना कॉन्टॅक्ट लेन्स वापरता येते. यासाठी त्यांनी नेत्ररोग तज्ञ डॉक्टरांकडे जाऊन डोळ्यांची तपासणी करावी. त्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याने चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरण्याचा विचार करावा. कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांना चष्मा वापरण्याची गरज नसते, असे डॉक्टरांचे मत आहे.
ही घ्या काळजी
कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना डोळे चोळू नयेत, गाडीवर धुळीसाठी पर्यायी गॉगल किंवा चष्मा वापरण्यास हरकत नाही, कॉन्टॅक्ट लेन्स ड्राय करू नये, त्या बॉक्समध्ये ठेवाव्यात, त्यातील पाणी पातळी सुस्थितीत ठेवावी.
परभणी येथे हैदराबाद, बंगलोर येथून कॉन्टॅक्ट लेन्स मागविल्या जातात. शहरात जवळपास शंभर ते दीडशे ऑप्टिकल्स आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व वेगवेगळ्या रंगाच्या कॉन्टॅक्ट लेन्स उपलब्ध केल्या जातात. - बाळू कदम.
आजकाल तरुणाई हौस म्हणून कॉन्टॅक्ट लेन्स वापरते. लेन्स वापरताना डॉक्टरांच्या सल्ल्याने काळजी घ्यावी. लेन्सची काळजी न घेतल्यास जंतूसंसर्ग किंवा बुबुळाला इजा होऊ शकते तसेच लेन्स फुटण्याची भीती असते. - महेश मंगरूळकर