एकाच दिवसात १२ हजार नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:20 AM2021-08-15T04:20:35+5:302021-08-15T04:20:35+5:30

परभणी : आठ दिवसांनंतर जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात कोरोना लसीचा साठा उपलब्ध झाल्याने लसीकरणाला शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात ...

Vaccination of 12,000 citizens in a single day | एकाच दिवसात १२ हजार नागरिकांचे लसीकरण

एकाच दिवसात १२ हजार नागरिकांचे लसीकरण

Next

परभणी : आठ दिवसांनंतर जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात कोरोना लसीचा साठा उपलब्ध झाल्याने लसीकरणाला शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात दिवसभरात १२ हजार ३३२ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या डोससाठी नागरिक मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करीत होते; परंतु पुरेशा प्रमाणात लससाठा उपलब्ध नसल्याने अनेकांचा दुसरा डोस रखडला होता. आरोग्य विभागाला लस उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील जास्तीत जास्त केंद्रांवर पूर्ण क्षमतेने लसीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

शनिवारी ११० केंद्रांवरून लसीकरण सत्र राबविण्यात आले. या केंद्रांवर नागरिकांचाही उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. अनेक केंद्रांवर सकाळपासूनच लसीसाठी रांगा लागल्या होत्या. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने लसीसाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लसीची नोंदणी न झाल्याने काही नागरिकांना लस न घेताच परतावे लागले.

५ लाख ९५ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण

जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ९५ हजार ७८५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात ४ लाख ४३ हजार ४०३ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, १ लाख ४७ हजार ३३२ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

असे झाले लसीकरण

पुरुष ३१३१८०

महिला २८२५४०

६० वर्षापुढील : १७८२१६

४५ ते ६० : १८२९७२

१८ ते ४५ : २३४५९७

Web Title: Vaccination of 12,000 citizens in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.