१६ ठिकाणी ३ हजार १३९ ग्रामस्थांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:17 AM2021-09-25T04:17:18+5:302021-09-25T04:17:18+5:30

पालम तालुक्यातील ५३ हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. ११ सप्टेंबर रोजी २ हजार ५९२ जणांचे लसीकरण ...

Vaccination of 3 thousand 139 villagers in 16 places | १६ ठिकाणी ३ हजार १३९ ग्रामस्थांचे लसीकरण

१६ ठिकाणी ३ हजार १३९ ग्रामस्थांचे लसीकरण

Next

पालम तालुक्यातील ५३ हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. ११ सप्टेंबर रोजी २ हजार ५९२ जणांचे लसीकरण झाले होते. तो रेकॉर्ड बुधवारी मोडण्यात आला. प्रत्येक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत हे शिबिर घेण्यात आले. त्यात बनवस ३६०, चाटोरी ३५९ , पेठशिवनी २६०, करेवाडी २३७, खरबधानोरा २१४, पेठपिंपळगाव २११, मुदखेड २०३, बेडकी तांडा व सोनेरी तांडा २०२, फरकंडा २०१, पोखर्णीदेवी १८५, सिरसम १७०, पुयणी १६०, उमरा १५१, घोडा १२१, भोगाव येथे १०५ मिळून ३ हजार १३९ लसीकरण करण्यात आले. विशेषतः दुपारपासून आलेल्या पावसात लसीकरण करण्यात आल्याचे डॉ. निरस यांनी सांगितले.

गुळखंड येथील कोरोना लसीकरण रद्द

पालम तालुक्यात २३ सप्टेंबर रोजी अगदी सकाळपासून पाऊस सुरू होता. कोरोनाची लस घेऊन येणारे चारचाकी वाहन रावराजूर आरोग्य केंद्रातून निघते. पुढे नळद येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने पूल पार करता येत नाही. त्यामुळे गुळखंड येथील लसीकरण रद्द करण्यात आले आहे. तत्पूर्वी, २२ सप्टेंबर रोजी खुर्लेवाडी येथील लसीकरण पावसामुळे रस्ता बंद असल्याने लसीकरण रद्द करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कालिदास निरस यांनी दिली.

Web Title: Vaccination of 3 thousand 139 villagers in 16 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.