आता व्हॉटस्ॲपद्वारे लसीकरण नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:22 AM2021-08-27T04:22:29+5:302021-08-27T04:22:29+5:30

अशी करता येणार नोंदणी व्हॉट्सॲप अकाऊंटमध्ये ९०१३१५१५१५ हा क्रमांक समाविष्ट करावा लागेल. स्वत:च्या व्हॉट्सॲवरून वरील क्रमांकावर बुक स्लॉट हा ...

Vaccination registration now via WhatsApp | आता व्हॉटस्ॲपद्वारे लसीकरण नोंदणी

आता व्हॉटस्ॲपद्वारे लसीकरण नोंदणी

Next

अशी करता येणार नोंदणी

व्हॉट्सॲप अकाऊंटमध्ये ९०१३१५१५१५ हा क्रमांक समाविष्ट करावा लागेल.

स्वत:च्या व्हॉट्सॲवरून वरील क्रमांकावर बुक स्लॉट हा मॅसेज पाठवावा. त्यानंतर संबंधित मोबाईलवर ६ अंकी ओटीपी प्राप्त होईल.

हा ओटीपी फिड केल्यानंतर दिनांक, केंद्राची माहिती, पिनकोड क्रमांक आणि लसीचा टप्पा आदी माहिती भरून कन्फर्मेशेन करावे लागेल.

नागरिकांसमोर वाढले पर्याय

जिल्ह्यात लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. दररोज ७५ ते ८० केंद्रांवर लसीकरण केले जात आहे.

लसीकरणाच्या नोंदणीसाठी अडचणी येऊ नयेत, यासाठी ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन नोंदणी करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे.

व्हॉट्सॲपचा वाढता वापर लक्षात घेता आता व्हॉट्सपद्वारेही लस घेण्यासाठी नोंदणी करता येणार आहे.

दिवसभरात ५ हजार नागरिकांचे लसीकरण

जिल्ह्यात गुरुवारी ७५ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. दिवसभरामध्ये एकूण ५ हजार १९२ नागरिकांची लसीकरण झाले आहे. आठवडाभरापासून दररोज लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ५ हजारांपेक्षा अधिक असल्याने लसीकरणाचा वेग वाढला आहे. १६ लाख ८ हजार ८३८ नागरिकांना लस द्यावयाची आहे.

Web Title: Vaccination registration now via WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.