परभणीत आज दुपारी २ नंतर होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:22 AM2021-07-07T04:22:11+5:302021-07-07T04:22:11+5:30
शहरातील सर्वच केंद्रांवर १८ वर्षांवरील नागरिकांना पहिला तसेच दुसरा डोस दिला जाणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने ...
शहरातील सर्वच केंद्रांवर १८ वर्षांवरील नागरिकांना पहिला तसेच दुसरा डोस दिला जाणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने लसीकरणाची नोंद केल्यानंतर लस दिली जात आहे. मंगळवारी १४ केंद्रांवर लसीकरण होणार आहे. मात्र, याची वेळ दुपारी २ ते सायंकाळी ६ अशी राहणार आहे. महापालिकेच्या तांत्रिक अडचणीमुळे लसीची वेळ बदलण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिली.
या ठिकाणी होणार लसीकरण
जायकवाडी रुग्णालय, खानापूर, खंडोबा बाजार, शंकरनगर, समाज मंदिर हाडको, बाल विद्यामंदिर या केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे, तर इंदिरा गांधी उर्दू प्राथमिक शाळा, दर्गा रुग्णालय, वर्मा नगर, साखला प्लॉट, इनायत नगर येथील केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार आहे.