नागरिक केंद्रांवर तरीही लसचा पत्ताच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:12+5:302021-06-11T04:13:12+5:30
सध्या महापालिकेच्या वतीने १२ केंद्र आणि २ रुग्णालय असे मिळून १४ ठिकाणी लसीकरण केले जाते. यासाठी लस घेण्यापूर्वी सर्व ...
सध्या महापालिकेच्या वतीने १२ केंद्र आणि २ रुग्णालय असे मिळून १४ ठिकाणी लसीकरण केले जाते. यासाठी लस घेण्यापूर्वी सर्व केंद्रांवर सकाळी ७ वाजता टोकन घेण्यासाठी नागरिकांना जावे लागते. या टोकननुसार आपला नंबर ज्या सत्रात आहे त्यावेळी केंद्रांवर जाऊन लस घेता येते. ही प्रक्रीया सोपी आणि वेळ वाचविणारी असली तरी सकाळी ११ वाजता होणाऱ्या पहिल्या सत्राचेच लसीकरण बुधवारी, गुरुवारी असे सलग २ दिवस काही वेळ विलंबाने झाले आहे. पहिल्या सत्रात जेवढे नागरिक टोकन घेऊन आले त्यांचे लसीकरण दुपारी १२ वाजेपर्यंत होणे अपेक्षित आहे. परंतू, गुरुवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत बाल विद्या मंदिर येथील केंद्रांवर लस आळीच नव्हती. येथील एका कर्मचाऱ्याला स्वत:ला जाऊन ह्या लस आणाव्या लागल्या. लस पुरवठा करणाऱ्या यंत्रणेचे वाहन काही तांत्रिक बाबीमुळे उशिराने आल्याने हा प्रकार घडला असे काही जणांनी सांगितले. प्रत्यक्षात २ दिवस सतत लसीकरणाला विलंब झाला आहे. महापालिका आरोग्य विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी लसीकरणास उशिर झालेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.
लसीचे डोस राहत आहेत शिल्लक
सध्या कोविशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना दिला जात आहे. यातही केवळ ५० लस एका केंद्राला दिल्या जात आहेत. यातही टोकन पध्दत आणि थेट केंद्रावर आल्यावर रजिस्ट्रेशन केल्यानंतर लस मिळत आहे. असे असूनही सध्या एक-एका ठिकाणी २० ते २५ डोस शिल्लक राहत असल्याचे सुत्रांनी सांगितले. हे डोस परत करण्यात येत आहेत.