वालूर येथे विविध धार्मिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:17 AM2020-12-22T04:17:12+5:302020-12-22T04:17:12+5:30
जप्त केेलेली वाहने पडून परभणी : येथील तहसील कार्यालयाच्या ...
जप्त केेलेली वाहने पडून
परभणी : येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात गौण खनिजाची अवैध वाहतूक केल्याच्या प्रमाणात जप्त केलेली वाहने पडून आहेत. गौण खनिज उपसा करण्याची परवानगी नसतानाही गौण खनिजाची वाहतूक केल्याने ही वाहने तहसील प्रशासनाने जप्त केली होती.
कालव्यातील गवत काढण्याची मागणी
परभणी : मानवत तालुक्यातील मंगरुळ (बु) येथील जायकवाडी कालवा क्र. ६४ मध्ये गवत मोठ्या प्रमाणात उगवले आहे. त्यामुळे कालव्यास धोका निर्माण झाला आहे. कालव्यातील गाळ काढण्याबाबत शेतकऱ्यांनी जायकवाडी विभागाकडे तक्रार केली होती.
शाश्वत पाण्यामुळे वाढले बागायती क्षेत्र
परभणी : जिल्ह्यात यावर्षी शाश्वत पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. शिवाय पाटबंधारे विभागाने जायकवाडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बागायती पिकांचे क्षेत्र वाढले आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा ही पिके घेतली जात असून, अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी प्रथमच उसाचे पीक घेतले आहे. उपलब्ध पाणीसाठ्यामुळे यंदा भिजवणीखाली येणारे क्षेत्रही वाढणार आहे.
स्थानकातील आसन व्यवस्था मोडकळीस
सेलू : येथील बसस्थानकातील अनेक आसने तुटल्याने आसन क्षमता कमी झाली आहे. उर्वरित आसन देखील मोडकळीस आल्याने बसस्थानकात गर्दी झाल्यानंतर प्रवाशांना जमिनीवर बसण्याची वेळ आली आहे. संबंधित विभागाकडून या बाबीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रवाशांत संताप व्यक्त होत आहे.
रब्बी ज्वारी पिकावर पडला करपा
कुपटा : परिसरात वीस दिवसांपासून रबी पेरणीस सुरुवात करण्यात आली आहे. सध्या ज्वारीच्या पिकाची उगवण चांगली झाली आहे. मात्र ज्वारीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तेव्हा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे.