वडाच्या झाडांची लागवड करून विद्यापीठात वटपौर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:23+5:302021-06-25T04:14:23+5:30

मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास कुलगुरु डॉ.अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले, संचालक ...

Vatpoornima celebrated at the University by planting Vada trees | वडाच्या झाडांची लागवड करून विद्यापीठात वटपौर्णिमा साजरी

वडाच्या झाडांची लागवड करून विद्यापीठात वटपौर्णिमा साजरी

Next

मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास कुलगुरु डॉ.अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ.उदय खोडके, प्राचार्य डॉ.अंगद सूर्यवंशी, प्राचार्या डॉ.जयश्री झेंड, डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. हिराकांत काळबांडे, डॉ. महेश देशमुख आदींसह विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी कुलगुरु डॉ.अशोक ढवण म्‍हणाले, गेल्‍या तीन वर्षांपासून विद्यापीठ परिसरात नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षलागवड व संगोपन मोहीम रा‍बविण्‍यात येत आहे, याचे दृश्य परिणाम दिसून येत आहेत. आजपर्यंत विद्यापीठ परिसरात ५० हजारपेक्षा जास्‍त वृक्षलागवड करण्‍यात आली. मधु‍मक्षिका व पक्षीवैभव वाढण्‍याच्‍या दृष्‍टीने विशिष्‍ट वृक्षांची लागवड केली जात आहे. यात वड, पिंपळ, उंबर, देशी जांभूळ आदींचा समावेश असून, फुलझाडे व फळझाडे यांचीही लागवड करण्‍यात येत आहे. आजपर्यंत विद्यापीठ परिसरात एक हजारपेक्षा अधिक वडांची लागवड करण्‍यात आली आहे.

कार्यक्रमात सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकांच्‍या हस्‍ते वड, बकुळ, महागुणी, कांचन, कॅशिओ आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. डॉ. जयश्री झेंड यांच्या हस्ते वटवृक्षाचे पूजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. स्नेहल शिलेवंत, डॉ. जावळे, प्रा. तोडमल, अक्षय इंगोले, निखिल पाटील, राकेश बगमारे, अजय चरकपल्ली आदींसह कर्मचारी व पदव्युत्तर विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी प्रयत्न केले.

Web Title: Vatpoornima celebrated at the University by planting Vada trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.