भाजीपाला, फळविक्रेते त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:50+5:302021-03-22T04:15:50+5:30

गंगाखेड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शनिवार बाजाराच्या ठिकाणी भाजीपाला व फळविक्रेत्यांसाठी बसण्याची व्यवस्था तालुका प्रशासनाने केली खरी. मात्र या ...

Vegetable, fruit sellers suffer | भाजीपाला, फळविक्रेते त्रस्त

भाजीपाला, फळविक्रेते त्रस्त

Next

गंगाखेड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शनिवार बाजाराच्या ठिकाणी भाजीपाला व फळविक्रेत्यांसाठी बसण्याची व्यवस्था तालुका प्रशासनाने केली खरी. मात्र या ठिकाणी नियमित भरल्या जाणाऱ्या मच्छी बाजारामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे. या दुर्गंधीमुळे ग्राहकांनी भाजीपाला व फळविक्रेत्यांकडे पाठ फिरविली आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात भरणारा भाजीपाला व फळविक्रीचा बाजार शुक्रवारपासून तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हटविला. त्यानंतर या फळ व भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यासाठी शनिवार बाजारात व्यवस्था करण्यात आली. मात्र या ठिकाणी अगोदरपासूनच मच्छी मार्केट आहे. या मच्छी व मांस विक्रीमुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे फळविक्रेते व भाजीपाला वि्क्रेत्यांकडे ग्राहक फिरकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रिकामी जागा सर्व्हे नंबर २४८ मध्ये फळ व भाजीपाला विक्रेत्यांसाठी हातगाडे लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तालुका प्रशासनाकडे फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी केली आहे.

Web Title: Vegetable, fruit sellers suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.