परभणीत भाजीपाल्याचे दर गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:35 AM2019-12-23T00:35:45+5:302019-12-23T00:35:54+5:30
काही दिवसांपूर्वी वधारलेला भाजीपाला, फळे व कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे़ दररोजच्या आहारात असलेल्या मेथी, शेपू, कोथंबीर, टोमॅटो, वांगी या भाज्यांना शहरातील बाजारपेठेत कवडीमोल दर मिळत असल्याचे रविवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : काही दिवसांपूर्वी वधारलेला भाजीपाला, फळे व कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे़ दररोजच्या आहारात असलेल्या मेथी, शेपू, कोथंबीर, टोमॅटो, वांगी या भाज्यांना शहरातील बाजारपेठेत कवडीमोल दर मिळत असल्याचे रविवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले़
मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे़ त्यामुळे खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाºया नगदी व पारंपारिक पिकांतून शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागले नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी भाजीपाला व फळपिकांकडे वळताना दिसून येत आहेत़
मागील आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकºयांचा फळे व भाजीपाला निसर्गाने मातीस मिळविला़ त्यामुळे परभणी शहरातील क्रांती चौक, शनिवार बाजार, गांधी पार्क, वसमत रस्त्यावरील काळी कमान, जिंतूर रस्त्यावरील महाराणा प्रताप चौकासह इतर ठिकाणच्या बाजारपेठेत भाजीपाल्यांचे भाव चांगलेच वधारले होते़ त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकºयांमध्ये भाजीपाल्यांतून मिळालेल्या उत्पादनाबद्दल समाधान होते; परंतु, डिसेंबर महिन्याच्या १५ तारखेपासून शहरातील बाजारपेठेत भाजीपाल्याची मोठी आवक होताना पहावयास मिळत आहे़ याचा थेट परिणाम भाजीपाला व फळांच्या दरांवर झाल्याचे दिसून आले़
रविवारी केलेल्या पाहणीमध्ये २०० रुपये किलो असणारी कोथंबीर १० रुपयांना दोन जुड्या विक्री होताना दिसून आली. त्याचबरोबर २० रुपये दराने एक जुडी मिळणारी मेथी शनिवारी केलेल्या पाहणीत १० रुपयांच्या चार जुड्या विक्री होताना दिसून आल्या़
गेल्या काही दिवसांत भाजीपाल्यांचे गगनाला भिडलेले दर अचानक घसरले़ त्यामुळे बाजारातील ओट्यांवर भाज्यांचे ढिग दिसून येत आहेत़
घसरलेल्या दरामुळे भाजीपाला विक्रीसाठी आणावयाचा खर्च देखील वसूल होत नसल्याने अनेक शेतकºयांच्या शेतात भाज्या पडून आहेत़ त्यामुळे शेतकºयांनी भाजीपाल्यांवर केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे़ त्यामुळे भाजीपाला उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत़
कांद्याचे भाव वधारले
४जिल्ह्यात भाजीपाल्याचे भाव गडगडले असले तरी कांद्याचे भाव अद्याप कमी झाले नाहीत़
४कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून, बाजारपेठेत सद्यस्थितीला १०० रुपये किलो प्रमाणे कांद्याची विक्री होत आहे़
४त्यामुळे इतर भाजीपाल्यांच्या तुलनेत कांद्याचे भाव वधारलेले आहेत़
आवक वाढल्याने घसरले भाव
४मागील महिनाभरात भाज्यांचे भाव चांगलेच वधारले होते़ त्यातून शेतकºयांना चांगला पैसाही मिळाला़ त्यामुळे शेतकºयांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जलस्त्रोतातील पाण्याचा उपयोग घेवून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली आहे़ सध्या १५ डिसेंबरपासून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मेथी, भेंडी, गवार, टोमॅटो, शेपू आदी भाज्यांची आवक होत आहे़ त्यामुळे आवक वाढल्याने बाजारपेठेतील भाज्यांचे भाव मात्र गडगडल्याचे दिसून येत आहेत़ एकीकडे नैसर्गिक संकटांचा सामना करणाºया शेतकºयांना उत्पादन झाले तर बाजारपेठेतील गडगडत्या भावाचा सामना करावा लागत असल्याचे पाहणीतून दिसून आले़
असे होते दर
मेथी- १० रुपये (४ जुड्या)
पालक- १० रुपये (२ जुड्या)
कोथंबीर- १० रुपये (२ जुड्या)
शेपू- १० रुपये (३ जुड्या)
टोमॅटो १० रुपये (१ किलो)
वांगी- ३० रुपये (१ किलो)
मिरची- ५० रुपये (१ किलो)
दोडका- ३० रुपये (१ किलो)
भेंडी- ३० रुपये (१ किलो)