वाहनधारकांनी ना पाळला नियम, ना भरला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:30 AM2021-02-18T04:30:01+5:302021-02-18T04:30:01+5:30

परभणी : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यापर्यंत ठिक पण, कारवाई केल्यानंतर दंडही न भरणाऱ्यांचीही येथे कमी नाही. मागच्या वर्षभरात शहरातील ...

Vehicle owners did not follow the rules and did not pay the fine | वाहनधारकांनी ना पाळला नियम, ना भरला दंड

वाहनधारकांनी ना पाळला नियम, ना भरला दंड

Next

परभणी : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यापर्यंत ठिक पण, कारवाई केल्यानंतर दंडही न भरणाऱ्यांचीही येथे कमी नाही. मागच्या वर्षभरात शहरातील वाहनधारकांनी तब्बल २२ हजार १६५ रुपयांचा दंड थकविला असून, आता या वाहनधारकांवर काय कारवाई होते? याकडे लक्ष लागले आहे.

शहरातील वाहनधारकांना शिस्त लागावी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी पोलीस दलातील वाहतूक शाखेच्या वतीने दिवसभर रस्त्यावर थांबून प्रयत्न केले जातात. यात वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हा महत्त्वाचा मुद्दा असतो. शिवाय वाहतूक व्यवस्था सुरळीत राहून वाहनधारकांना त्रास होऊ नये, यासाठीही प्रयत्न केेले जातात. वाहनधारकांना शिस्त लागावी याच उद्देशाने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. परभणी शहरातील वाहतूक व्यवस्था तर पार कोलमडून गेली आहे. नो पार्कींगमध्ये वाहन लावणे, ट्रीपल सीट वाहन चालविणे, विरुद्ध मार्गाने वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे यासह कर्णकर्कश्य आवाज करीत वाहन दामटण्याचे प्रकार शहरात नित्याचे झाले आहेत. याविरुद्ध वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची मागच्या वर्षभरात कारवाई केली.

१ जानेवारी २०२० ते ३१ जानेवारी २०२० या काळात २० हजार ७७९ केसेस करुन या वाहनधारकांकडून ५३ लाख २४ हजार ८५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र त्यापैकी २२ हजार १६५ रुपयांचा दंड अद्यापही वसूल झाला नाही. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याबरोबरच या वाहनधारकांनी दंड भरण्यातही कुचराई केली आहे. त्यामुळे अशा वाहनधारकांवर आता पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते? याकडे लक्ष लागले आहे.

तर वाहनाचा परवाना होऊ शकतो रद्द

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर वाहतूक शाखेकडून वाहनधारकांना दंड केला जातो. दंडाची रक्कम वाहनधारकाकडून वसूल केली जाते. मात्र एकाच वाहनधारकाने तीन वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर त्या वाहनधारकाचा वाहन परवाना रद्द करण्याचे अधिकार पोलिसांकडे आहेत. शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालवण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र अद्यापपर्यंत अशा पद्धतीची कारवाई झालेली नाही. त्यामुळे वाहनधारकांनीही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

कारवाई

२०,७७९

दंड: ५३,५४,८५०

महिनानिहाय कारवाया व दंड

जानेवारी : २२५४

दंड : ५३६४००

फेब्रुवारी : १९१९

४१४२००

मार्च : १४३६

४४२६००

एप्रिल : २६

८०००

मे : ८४२

२०७५००

जून : १४९०

३६७७००

जुलै : ५४३२

१२८७४००

ऑगस्ट : २५२३

६८९४००

सप्टेंबर : ९१७

३६९४००

ऑक्टोबर : ८७९

२२२६००

नोव्हेंबर : १६०४

३८३४५०

डिसेंबर : १६६६

३९६२००

Web Title: Vehicle owners did not follow the rules and did not pay the fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.