थंडीचा बळी; पाथरी तालुक्यात शेकोटीत होरपळून वृद्धेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 04:01 PM2020-01-02T16:01:34+5:302020-01-02T16:05:12+5:30

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

A victim of colds; Death of an elderly women in a fire in Pathari taluka | थंडीचा बळी; पाथरी तालुक्यात शेकोटीत होरपळून वृद्धेचा मृत्यू

थंडीचा बळी; पाथरी तालुक्यात शेकोटीत होरपळून वृद्धेचा मृत्यू

Next

पाथरी : थंडी पासून बचाव करण्यासाठी व शरीराला ऊब मिळावी म्हणुन नागरिकांकडून शेकोटीचा आधार घेतला जातोय. पण याच शेकोटीने पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील महिलेचा घात केला. वैजंताबाई रंगनाथ घुंबरे असे आगीत होरपळून मृत पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील वैजंताबाई रंगनाथ घुंबरे (वय 60 ) ह्या बुधवार दि 1 जानेवारी रोजी घरातील पेटवलेल्या चुलीसमोर उब मिळावी म्हणुन बसल्या होत्या, यावेळी त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. याचवेळी घरात कोणीही नसल्याने त्यांच्या किंचाळ्या ऐकून गल्लीतील काहींनी त्यांना मदत करे पर्यंत त्यांना आगीने कवेत घेतले. यात त्या गंभीररित्या जखमी होऊन ७४ टक्केपर्यंत भाजल्या गेल्या. 

गावातील शासकीय रुग्णवाहिकेद्वारे त्यांना परभणीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ,उपचारा दरम्यान गुरुवारी पहाटे 5 वाजता त्यांचा मृत्यु झाला. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Web Title: A victim of colds; Death of an elderly women in a fire in Pathari taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.