मतदान केल्याचा व्हिडिओ व्हायरल; परभणीत एकाविरुद्ध गुन्हा

By मारोती जुंबडे | Published: November 20, 2024 04:08 PM2024-11-20T16:08:46+5:302024-11-20T16:10:20+5:30

मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग केल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल

Video of voting goes viral; Offense against one in Parbhani | मतदान केल्याचा व्हिडिओ व्हायरल; परभणीत एकाविरुद्ध गुन्हा

मतदान केल्याचा व्हिडिओ व्हायरल; परभणीत एकाविरुद्ध गुन्हा

परभणी: मतदान केलेला व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी नानलपेठ पोलिसात एका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी विधानसभा मतदारसंघासाठी ३३८ केंद्रांवर मतदान होत आहे. मतदानासाठी सकाळपासून नागरिकांनी गर्दी केली आहे. परभणी शहरातील शारदा महाविद्यालयाच्या खोली क्रमांक १ मध्ये शेख सुलेमान याने स्वतःचे मतदान करताना बॅलेट युनिट वरील अनुक्रमांक १४ वरील निवडणूक निशाणीवर बटन दाबून मत टाकले. तसा फोटो त्याच्या मोबाईलवर घेऊन स्वतः सोशल मीडियावरून व्हायरल केला. शेख सुलेमान याने मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग केल्याचे निदर्शनास आल्याचे प्रवीण देवसेटवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी कलम २२३ भारतीय न्याय संहिता २०२३ सह कलम १२८ कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवकर हे करीत आहेत.

सहा तासात जिल्ह्यात ३३.१२ टक्के मतदान
विधानसभा निवडणूकीसाठी बुधवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सकाळी ७ ते १ वाजेदरम्यान सरासरी ३३.१२ टक्के मतदान झाले असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी माहिती दिली. जिल्हा प्रशासनाकडून सकाळी ७ ते १ या सहा तासात झालेल्या मतदानाची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.६४ टक्के, परभणी २७.६६, गंगाखेड ३७.६५ तर पाथरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३४.६१ टक्के मतदान झाले आहे.

Web Title: Video of voting goes viral; Offense against one in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.