video : पुराच्या पाण्यात स्टंटबाजीची हौस; कुपटा येथील दोघे थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:33 PM2021-09-07T16:33:04+5:302021-09-07T16:37:51+5:30

rain in Parabhani : गावालगतच्या ओढ्याला पूर आला. त्यामुळे कुपटा गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला.

video: Stunts increase in flood waters; The two from Kupta briefly survived | video : पुराच्या पाण्यात स्टंटबाजीची हौस; कुपटा येथील दोघे थोडक्यात बचावले

video : पुराच्या पाण्यात स्टंटबाजीची हौस; कुपटा येथील दोघे थोडक्यात बचावले

Next

परभणी : जिल्ह्यात जोरदार पावसाने दाणादाण उडाली आहे. छोटेमोठे तलाव ओसंडून वाहत आहेत. नद्यानाल्यांना पुर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्ये काही जण स्टंटबाजी करणे सोडत नाहीत. सेलू तालुक्यातील कुपटा येथे स्टंटबाजी करत दोघांनी पुराच्या पाण्यातून पूल पार करण्यास सुरुवात केली. प्रवाह वेगवान असल्याने दोघेही वाहून केले. सुदैवाने दोघेही पोहून कसेबसे बाहेर पडले आहेत. ( Stunts increase in flood waters; The two from Kupta briefly survived) 

सेलू तालुक्यातील कुपटा येथील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात दोन युवकांनी स्टंटबाजी केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. सेलू तालुक्यातील कुपटा व परिसरात गेल्या ३ दिवसांपासून सातत्याने पावसाची रिपरिप सुरू आहे. सोमवारी सकाळपासून या भागात जोरदार पाऊस सुरु होता. त्यामुळे गावालगतच्या ओढ्याला पूर आला. त्यामुळे कुपटा गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला. 

हेही वाचा - Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव

ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह गतीमान असल्याने दोन्ही बाजुच्या तिरावरील ग्रामस्थ पुर ओसण्याची वाट पाहत असताना कुपटा येथील दोन युवक पाण्यात उतरले. काही पावले पाण्यातून वाट काढत चालत असताना पाण्याच्या प्रवाहामुळे ते वाहुन जाऊ लागले. त्यामुळे तिरावरील ग्रामस्थांनी आरडा ओरड सुरू केली; पंरंतु या युवकांना पोहता येत असल्याने काही अंतरावर ते पोहत जाऊन पाण्याच्या बाहेर आले. त्यांच्या या स्टंटबाजीची चर्चा गाव परिसरात सोमवारपासून सुरू आहे.

हेही वाचा - ओव्हर फ्लो तलावात तरूणांचा जीवघेणा स्टंट; जिव धोक्यात घालून पोहण्यासाठी उड्या

Web Title: video: Stunts increase in flood waters; The two from Kupta briefly survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.