पोट भाडेकरू ठेवून शासन करारनाम्याचा केला भंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:23 AM2021-09-09T04:23:15+5:302021-09-09T04:23:15+5:30
गाळेधारकांनीच गाळे भाड्याने देण्यास केली सुरुवात भारत स्काऊट आणि गाईड कार्यालयाने पोट भाडेकरू ठेवता येत नाही, असे करारनाम्यात स्पष्ट ...
गाळेधारकांनीच गाळे भाड्याने देण्यास केली सुरुवात
भारत स्काऊट आणि गाईड कार्यालयाने पोट भाडेकरू ठेवता येत नाही, असे करारनाम्यात स्पष्ट केले असतानाही काही गाळेधारकांनी गाळ्याच्या शटरवरच हे गाळे भाड्याने देणे असल्याची जाहिरात केली आहे. त्यामुळे सरळ सरळ या विभागाने केलेल्या करारनाम्याचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
या संदर्भात विभागीय क्रीडा उपसंचालक तथा भारत स्काऊट आणि गाईडचे राज्य चिटणीस संजय महाडिक यांनी जिल्हा भारत स्काऊट आणि गाईडच्या मुख्य आयुक्तांना ३ सप्टेंबर रोजी पत्र पाठविले असून, त्यात या जिल्हा संस्थेची फसवणूक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे परभणी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली या अनुषंगाने कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.