रानभाज्यांतून मिळतात जीवनसत्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:22 AM2021-08-12T04:22:21+5:302021-08-12T04:22:21+5:30
परभणी, : नैसर्गिकरित्या शेतामध्ये उगवलेल्या विषमुक्त रानभाज्यांचा दररोजच्या जेवणामध्ये समावेश असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी जीवनसत्त्वे व खनिजांनी ...
परभणी, : नैसर्गिकरित्या शेतामध्ये उगवलेल्या विषमुक्त रानभाज्यांचा दररोजच्या जेवणामध्ये समावेश असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी जीवनसत्त्वे व खनिजांनी परिपूर्ण असलेल्या रानभाज्यांचा समावेश आहारात करावा, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी आयोजित रानभाज्या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. देवसरकर बोलत होते. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक एस. बी. आळसे, उपप्रकल्प संचालक के. आर. सराफ, तालुका कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे, विस्तार विद्यावेता गजानन गडदे आदी उपस्थित होते.
डॉ. देवसरकर म्हणाले, रानभाज्या या औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. तसेच त्यांचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढत असते. या महोत्सवात कर्टुली, टालका, पाथरा, हदगा, अळू, घोळ, तांदूळजा, भुई आवळा, कपाळफोडी, कुर्डू या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या, तर वाघाटे, करटुले, काशीफळ, करवंद, ड्रॅगनफ्रुट आदी रानफळांची माहिती देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश इक्कर, प्रमोद रेंगे, विलास जोशी, शिवराज कदम, योगेश पवार, रवी माने, स्वाती घोडके आदींनी प्रयत्न केले.