२५ जणांचे स्वेच्छेने रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:31+5:302021-06-16T04:24:31+5:30
परभणी : जागतिक रक्तदान दिनानिमित्त सोमवारी २५ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या रक्तदात्यांचा तसेच प्लाझमा देणाऱ्या ३० जणांचा येथील ...
परभणी : जागतिक रक्तदान दिनानिमित्त सोमवारी २५ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या रक्तदात्यांचा तसेच प्लाझमा देणाऱ्या ३० जणांचा येथील शासकीय रक्तपेढीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जिल्हा रुग्णालयातील शासकीय मेट्रो रक्तपेढीच्या वतीने १४ जून रोजी कार्ल लॉर्डस्टेनर यांचा जन्मदिन जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीषा राठोड, रक्तपेढीचे प्रमुख उद्धव देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुहास देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी स्वेच्छेने रक्तदान करणारे राजकुमार भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. जागतिक रक्तदान दिनानिमित्त स्वेच्छेने रक्तदान करण्यासाठी आलेल्या २५ जणांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात ३० जणांनी प्लाझ्मा दान केल्या होत्या. या प्लाझ्मा दात्यांचाही कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रक्तपेढीतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
१७४ बॅग साठा
जिल्हा रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ६०० बॅग साठवणुकीची क्षमता असलेल्या या रक्तपेढीत सद्यस्थितीला १७४ बॅग रक्तसाठा उपलब्ध आहे.