मतदानाच्या बातमीच्या प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:15 AM2021-01-18T04:15:37+5:302021-01-18T04:15:37+5:30
पहिल्या प्रशिक्षण स्थळी आरटीपीसीआर चाचणी झाली. मतदान प्रक्रियेत मतदान अधिकारी क्रमांक १ म्हणून काम केले. या दिवशी अनेक मतदारांशी ...
पहिल्या प्रशिक्षण स्थळी आरटीपीसीआर चाचणी झाली. मतदान प्रक्रियेत मतदान अधिकारी क्रमांक १ म्हणून काम केले. या दिवशी अनेक मतदारांशी संपर्क आला. साहित्य जमा केल्यानंतर मात्र आरटीपीसीआर झाली नाही. त्या दिवशी थोडीशी भीती वाटली. घरी गेल्यानंतर गरम पाण्याने स्नान केले. साेबतचे सर्व साहित्य सॅनिटाईज केले. सुरक्षितता म्हणून घरात फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळत आहे.
- शिवप्रसाद आहेर, कर्मचारी
प्रशिक्षणाच्या वेळी आरटीपीसीआर चाचणी झाली. त्यानंतर मतदान अधिकारी क्रमांक २ म्हणून काम पाहिले. मतदारांच्या सह्या घेणे, बोटाला शाई लावणे अशी कामे केल्याने मतदारांशी जवळून संपर्क आला होता. त्यामुळे मनात काहीशी भीती होती. साहित्य जमा केल्यानंतर मात्र आरटीपीसीआर झाली नाही. दाेन दिवसांपासून स्वत:हून दक्षता घेत आहे.
- विजय परभणीकर, कर्मचारी
मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम केल्याने माझ्यावर जबाबदारी होती. मतदारांची रांग व कामाचा व्याप यांमुळे त्या दिवशी काेरोनाचा विसर पडला. निवडणूक संपल्यानंतरही आरटीसीपीआर झाली नाही. त्यामुळे घरी गेल्यावर काहीशी भीती वाटत होती. सर्व साहित्य सॅनिटाईज करून स्नान केले. त्यानंतर परिवारातील सदस्यांपासून स्वत:ला वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
- संजय डांगरे, कर्मचारी