११ ग्रामपंचायतीत एक-दोन जागांसाठी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:14 AM2021-01-09T04:14:00+5:302021-01-09T04:14:00+5:30
परभणी तालुक्यातील दुर्डी व कैलासवाडी ग्रामपंचायतीत प्रत्येकी सातपैकी सहा जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. एका जागेसाठी दोन उमेदवार असल्याने ...
परभणी तालुक्यातील दुर्डी व कैलासवाडी ग्रामपंचायतीत प्रत्येकी सातपैकी सहा जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. एका जागेसाठी दोन उमेदवार असल्याने मतदान होत आहे. जिंतूर तालुक्यातील भोगाव ग्रामपंचायतीत १३ पैकी ११ जागा बिनविरोध निवडल्या आहेत. दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. पिंपळगाव काजळे येथे एका जागेसाठी निवडणूक होत आहे. सोनपेठ तालुक्यातील पारधवाडी येथे ७ पैकी ५ जागा बिनविरोध निवडल्या असून, दोन जागांसाठी मतदान होत आहे. गंगाखेड तालुक्यातील बनपिंपळा ग्रामपंचायतीत एका जागेसाठी निवडणूक होत आहे. पाथरी तालुक्यातील रेणापूर ग्रामपंचायतीत ११ पैकी ९ जागा बिनविरोध आल्या असून, दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. पाथरगव्हाण, अंधापुरी येथेही प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक होत आहे.
४९८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक
जिल्ह्यातील ५६६ पैकी ४९८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सद्यस्थितीत सुरू आहे. यापूर्वीच जिल्ह्यातील ६८ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे १२ ग्रामपंचायती सेलू तालुक्यातील असून, परभणी तालुक्यातील ९, जिंतूरमधील ११, पाथरीतील ४, मानवतमधील २, सोनपेठ तालुक्यातील ५, गंगाखेड तालुक्यातील १०, पालम तालुक्यातील ८ व पूर्णा तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.