परभणी जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात, नऊ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदान
By मारोती जुंबडे | Published: April 26, 2024 11:09 AM2024-04-26T11:09:02+5:302024-04-26T11:28:13+5:30
परभणी मतदारसंघात २ हजार २९० मतदान केंद्रावर मतदान होत आहे.
परभणी: दुसऱ्या टप्प्यातील परभणी लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत ९. ७२ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
या मतदारसंघात २ हजार २९० मतदान केंद्रावर मतदान होत आहे. त्यापैकी १ हजार १४५ मतदान केंद्रावर वेब कास्टिंगव्दारे मतदान पार पडत आहे. त्यापैकी ४७ मतदान केंद्र संवेदनशील असून तेथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ६ हजार ८७० बॅलेट युनिट तर २ हजार २९० कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रे आहेत.
परभणी जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) April 26, 2024
सकाळच्या सत्रात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. #LokSabhaElections2024#parabhani_loksabha#VotingDaypic.twitter.com/iNg9gsjmKS
आज जिल्ह्यात ४० अंशावर तापमान राहणार असल्याने मतदान केंद्रावर सावली,पाणी ,दिव्यांगासाठी रॅम्प, सहाय्यता केंद्र,प्राथमिक उपचार यासह विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. परभणी तालुक्यातील कुंभारी बाजार, आर्वी, शहापूर, कारला तर जिंतूर तालुक्यातील आसेगाव, पूर्णा तालुक्यातील देगाव, मानवत तालुक्यातील मानोली, पाथरी शहरातील माळीवाडा येथे मतदारांनी सकाळपासूनच केंद्रावर मतदानासाठी रांगा लावल्या आहेत.