चाळीस लाखांच्या निधीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:16 AM2021-01-17T04:16:01+5:302021-01-17T04:16:01+5:30
परभणी : जिल्ह्यातील १८७ लाभार्थी शेतकऱ्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत फळबागेची लागवड केली. मात्र, यातील १३२ लाभार्थ्यांना ...
परभणी : जिल्ह्यातील १८७ लाभार्थी शेतकऱ्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत फळबागेची लागवड केली. मात्र, यातील १३२ लाभार्थ्यांना अद्यापही ४० लाख रुपयांच्या निधीची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पिकांना फाटा देत फळबागेेची लागवड वाढावी, यासाठी राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अमलात आणली. या योजनेंतर्गत फळबाग लावणाऱ्या लाभार्थ्यांना ३ ते ४ टप्प्यांंत अनुदानाचे वाटप करण्यात येते. परभणी तालुक्यातील १८७ शेतकऱ्यांनी २०१९-२० या आर्थक वर्षात या फळबाग लागवड योजनेचा लाभ घेतला. त्यातील ५५ लाभार्थ्यांना तालुका कृषी विभागाच्या वतीने प्राप्त झालेल्या निधीनुसार सोडत घेत २० लाख रुपयांचे वाटप केले. अद्यापही १३२ लाभार्थ्यांसाठी ४० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या संदर्भात कृषी विभागाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठिवला आहे. मात्र, राज्य शासनाकडून एक वर्षाचा कालावधी उलटला तरीही अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे तालुक्यातील १३२ लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने याकडे लक्ष देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी लाभार्थ्यांमधून होत आहे.