मानवत रोड ते परळी रेल्वे मार्गाचे सोनपेठकरांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:22 AM2021-02-17T04:22:45+5:302021-02-17T04:22:45+5:30
बेकायदेशीर मुरूम उपसाकडे दुर्लक्ष बोरी: जिंतूर तालुक्यातील कोक पासून जवळच असलेल्या रोहिला पिंपरी रस्त्यावरील गायरान जमिनीतून मागील १५ दिवसापासून ...
बेकायदेशीर मुरूम उपसाकडे दुर्लक्ष
बोरी: जिंतूर तालुक्यातील कोक पासून जवळच असलेल्या रोहिला पिंपरी रस्त्यावरील गायरान जमिनीतून मागील १५ दिवसापासून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मुरमाचा उपसा केला जात आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
बसस्थानकातून वाहते नाल्याचे पाणी
ंगाखेड: येथील बसस्थानक परिसरातून वाहणाऱ्या सांडपाण्याचा नाला तुंबल्यामुळे त्यातील घाण पाणी चक्क बसस्थानकातून वाहत आहे. त्यामुळे बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप येत आहे. दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे एसटी महामंडळाच्या प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
४३ गावातील ग्रामस्थांचा सिंचनाचा प्रश्न सुटेना
परभणी: परभणी व मानवत तालुक्यातील माथ्यावर असलेल्या ४३ गावांमधील शेतकऱ्यांनी सिंचनाच्या प्रश्नावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना साकडे घातले होते. मात्र अद्यापही या ४३ ावातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नियम मोडणाऱ्याकडून लाखो रुपये वसूल
परभणी: वाहतुकीचे नियम मोडत शहरातील रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. यामध्ये मंगळवारी हजारो रुपयांचा महसूल वसूल केला असून वर्षभरात ५५ लाख रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही वाहनधारकांना शिस्त लागत नसल्याने दंडाच्या रकमेत वाढ होत आहे.