नोकरीत न घेतल्याने उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:47 AM2021-02-20T04:47:51+5:302021-02-20T04:47:51+5:30
परभणी : अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून न घेतल्याने गुलाब खिल्लारे व कुटुुुंबीयांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर १ ...
परभणी : अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून न घेतल्याने गुलाब खिल्लारे व कुटुुुंबीयांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर १ मार्चपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
जिंतूर येथील गुलाब खिल्लारे हे अनुंकपाधारक असून १४ वर्षांपासून शासकीय सेवेत रुजू करून घेण्याची ते प्रतीक्षा करीत आहेत. आगामी तीन महिन्यांत नोकरीवर रुजू होण्याची त्यांची वयोमर्यादा संपत आहे. प्रतीक्षा करूनही शासकीय सेवेत सामावून घेतले नसल्याने कुटुंबावर अन्याय झाला आहे. आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. मुलीचे लग्न, आईचे आजारपणावर औषधोपचारासाठी पैशांची व्यवस्था होत नाही. तेव्हा ३० दिवसांत सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी १ मार्चपासून सा. बां. विभागासमोर उपोषण करण्याचा इशारा गुलाब खिल्लारे, मीराबाई खिल्लारे, सुबोध खिल्लारे व प्रज्ञा खिल्लारे यांनी दिला आहे.