जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्यासाठी पाण्याचा विसर्ग; ८ आवर्तने मंजूर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 12:33 PM2017-11-18T12:33:17+5:302017-11-18T12:37:50+5:30

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे परभणी जिल्ह्यासाठी आठ आवर्तन मंजूर करण्यात आले असून शुक्रवारी (दि.१७) सकाळी ८ वाजता ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे.

Water flow for Parbhani district from left bank of Jayakwadi; 8 recurrences approved | जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्यासाठी पाण्याचा विसर्ग; ८ आवर्तने मंजूर 

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्यासाठी पाण्याचा विसर्ग; ८ आवर्तने मंजूर 

googlenewsNext
ठळक मुद्देजायकवाडीच्या डाव्या कालव्यावर परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत, परभणी आणि पूर्णा तालुक्यांचा भाग येतो.डाव्या कालव्याच्या कि.मी. १२२ ते २०८ लाभक्षेत्रात व त्यावरील वितरण प्रणालीत पाणी सोडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून शेतक-यांकडून करण्यात येत होती.सध्या रबी हंगामासाठी चार आवर्तन तसेच उन्हाळी हंगामासाठी चार आवर्तन अशा एकूण ८ आवर्तनास जलसंपदा मंत्र्यांची मंजुरी

परभणी :जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे परभणी जिल्ह्यासाठी आठ आवर्तन मंजूर करण्यात आले असून शुक्रवारी (दि.१७) सकाळी ८ वाजता ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. पाथरी भागात रविवारी रात्रीपर्यंत हे पाणी दाखल होणार आहे. 

पैठण येथील जायकवाडी धरण यावर्षी १०० टक्के भरले आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर परभणी जिल्ह्यातील पाथरी, मानवत, परभणी आणि पूर्णा तालुक्यांचा भाग येतो. डाव्या कालव्याच्या कि.मी. १२२ ते २०८ लाभक्षेत्रात व त्यावरील वितरण प्रणालीत पाणी सोडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून शेतक-यांकडून करण्यात येत होती. जायकवाडीच्या पाणी वाटपासंदर्भात मुंबई येथे १३ नोव्हेंबर रोजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक होऊन परभणी जिल्ह्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय झाला.

सध्या रबी हंगामासाठी चार आवर्तन तसेच उन्हाळी हंगामासाठी चार आवर्तन अशा एकूण ८ आवर्तनास मंजुरी देण्यात आली असून ३० नोव्हेंबरपर्यंत शेतक-यांनी पाणी अर्जाची मागणी करावी, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्याला डाव्या कालव्यात १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले  आहे. प्रती घंटा २०० क्युसेसने यात वाढ केली जाणार असून पैठण येथून सोडण्यात आलेले पाणी १९ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत परभणी जिल्ह्यात पाथरी भागातील कालवा १२२ वर दाखल होईल. पहिल्या आवर्तनाची वाट पाहणाºया शेतकºयांना रबी पेरणी तसेच खरिपातील पिकांसाठी याचा लाभ होणार आहे. 

नियोजनाचा अभाव
परभणी जिल्ह्यासाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असले तरी सुुरुवातीच्या काळात कराव्या लागणा-या नियोजनाचा पूर्णत: अभाव दिसून येत आहे. १६ नोव्हेंबर रोजी पाणी नियोजनासंदर्भात जायकवाडीच्या परभणी येथील कार्यालयात आयोजित करण्यात आलेली बैठक अंतर्गत वाद-विवादाने रद्द झाली. यामुळे पाणी नियोजन रखडल्या गेल्याने जिल्ह्यातील रबी हंगामाला याचा मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

एकच उपअभियंता
जायकवाडी विभाग क्रमांक २ अंतर्गत सहा उपविभाग आहेत. तसेच सात उपअभियंत्याची पदे उपलब्ध असताना एकच उपअभियंता सध्या कार्यरत आहे. त्यामुळे उपविभागाचा पदभार शाखा अभियंत्याकडे असल्याने ऐन हंगामाच्या तोंडावर नियोजन विस्कटल्याचे दिसून येत आहे.

पाथरी येथील पदही रिक्त
पाथरी येथे जायकवाडीचे उपविभागीय कार्यालय असून या कार्यक्षेत्रांतर्गत पाथरी, मानवत तालुक्यांचा भाग येतो. येथील उपअभियंता पद गेल्या दीड महिन्यापासून रिक्त आहे. शाखा अभियंता डी.बी. खारकर यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला  आहे. 

रबी हंगामातील पिकांसाठी फायद्याचे 
जायकवाडी धरणातून कालवा लाभक्षेत्रातील १२२ ते २०८ कालव्यावर रबी हंगामासाठी चार आवर्तन मंजूर करण्यात आले असून शासन स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. रबी हंगामातील पिकांसाठी शेतक-यांनी संबंधित सिंचन शाखेकडे मागणी अर्ज करून पाण्याचा लाभ घ्यावा. तसेच हे पाणी शेतक-यांसाठी लाभदायक ठरणार आहे. 
- आ. मोहन फड, मतदार संघ,पाथरी 

शेतक-यांकडून अर्ज प्राप्त 
जायकवाडीच्या डाव्या कालव्यात पैठण येथील धरणातून आज पाणी सोडण्यात आले असून येत्या दोन दिवसात २२०० क्युसेसने पाणी या भागात दाखल होणार आहे. शेतक-यांकडून पाण्यासाठी मागणी अर्ज भरून घेतले जात आहेत. 
- डी.बी. खारकर, शाखा अभियंता, पाथरी

Web Title: Water flow for Parbhani district from left bank of Jayakwadi; 8 recurrences approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.