जायकवाडीत येणार पाणी: परभणीत फटाके वाजवून जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:39 AM2018-11-01T00:39:04+5:302018-11-01T00:40:08+5:30
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्यास विरोध करणारी याचिका फेटाळून लावत मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय ३१ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचे परभणीत फटाके वाजवून स्वागत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्यास विरोध करणारी याचिका फेटाळून लावत मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय ३१ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचे परभणीत फटाके वाजवून स्वागत करण्यात आले.
जायकवाडी धरणाचे पाणी गोदावरी खोऱ्यातील उर्ध्व धरणात अडवून नगर, नाशिक जिल्ह्यातील साखर सम्राटांनी मराठवाड्याला पाणी देण्यासाठी विरोध केला होता. मोठ्या संघर्षानंतर समन्यायी पाणी वाटपचा कायदा २००५ मध्ये तत्कालीन शासनाला करावा लागला; परंतु, या कायद्यालाही न जुमानता पाणी अडविणे सुरुच ठेवले होते. या प्रकरणी मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायलयाने मराठवाड्याच्या बाजुने आदेश दिले. त्यानुसार १५ आॅक्टोबर रोजी गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक व नगर, नाशिकमधील पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी ७ टीएमसी पाण्याची तुट काढली. त्यानुसार ९ टीएमसी पाणी जायकवाडी प्रकल्पात सोडणे अपेक्षित असताना अधिकाºयांनी वेळखाऊ भूमिका घेतल्याने डॉ.पद्मश्री विठ्ठलराव विखे व संजीवनी साखर कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली. ३१ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका खारीज करुन मराठवाड्याच्या न्याय हक्काचे पाणी सोडण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाके वाजवून निर्णयाचे स्वागत झाले. शेतकरी एकजुटीचा विजय असो, भारतीय न्याय व्यवस्थेचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी किसान सभेचे राज्य सहसचिव कॉ. विलास बाबर, अभिजीत जोशी, एकनाथराव साळवे, अनंतराव कच्छवे, अंकुश तवर, माणिक सूर्यवंशी, भूजंगराव धस, शिवाजी कच्छवे, किशन जगताप, भास्कर कच्छवे, गणेश बायस, सुरेश शिसोदे, बाजीराव सोगे, गणेश कच्छवे, ज्ञानोबा चंदेल, माणिकराव कच्छवे, गंगाधर जवंजाळ, नरसिंग कच्छवे आदी उपस्थित होते.