जलवाहिनीला गळती; हजारो लीटर पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:13 AM2021-04-29T04:13:13+5:302021-04-29T04:13:13+5:30
शहरात जलवाहिनीला गळती लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातून अनेक वेळा पाण्याचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे, नवीन जलवाहिनीलाही ...
शहरात जलवाहिनीला गळती लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातून अनेक वेळा पाण्याचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे, नवीन जलवाहिनीलाही काही ठिकाणी गळती लागल्याचे प्रकार झाले होते. २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील विसावा कॉर्नर भागातील जलवाहिनीला गळती लागली. त्यातून हजारो लीटर पाणी रस्त्यावर वाहिले. दोन तासांपासून पाणी रस्त्यावर वाहत असल्याने याच परिसरात असलेल्या पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थान परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. विशेष म्हणजे, या भागात डॉक्टर लेनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली. त्यामुळे विसावा कॉर्नर ते डॉक्टर लेन या मार्गावरही मोठ्या प्रमाणात पाणी झाले होते. दोन ते अडीच तासापर्यंत गळती दुरुस्त झाली नसल्याने हजारो लीटर पाण्याचा अपव्यय झाला आहे.