परभणी, पूर्णा शहरांसाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:37 AM2017-12-21T00:37:27+5:302017-12-21T00:37:33+5:30
परभणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. २१ डिसेंबर रोजी हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असून साधारणत: दोन दिवसांमध्ये राहटी येथील बंधाºयात पाणी पोहचेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडले जाणार आहे. २१ डिसेंबर रोजी हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असून साधारणत: दोन दिवसांमध्ये राहटी येथील बंधाºयात पाणी पोहचेल.
परभणी शहराला राहटी बंधाºयातून पाणीपुरवठा होतो. या बंधाºयामध्ये सिद्धेश्वर प्रकल्पामधून पाणी घेतले जाते. मागील महिन्यात १ दलघमी पाणी सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये घेण्यात आले. मात्र बंधाºयाच्या एका गेटची पाटी निघाल्याने अर्धे पाणी वाहून गेले होते.
दोन दिवसांपूर्वी राहटी बंधाºयातील पाणी संपल्याने परभणी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेता महानगरपालिकेने जिल्हाधिकाºयांमार्फत पूर्णा पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी केली. मात्र पाणी उपलब्ध नसल्याचे कारण देत सिद्धेश्वरमधून पाणी देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार परभणी शहर महापालिका आणि पूर्णा शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या जलाशयातून २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेनंतर १२ क्युसेस पाणी दुधना नदीपात्रात सोडले जाणार आहे. साधारणत: दोन दिवसात पाणी राहटी बंधाºयात पोहचेल.
या पाण्यामुळे परभणीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
नदीकाठावरील गावांना इशारा
४नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने जिल्हाधिकाºयांनी नदीपात्रावरील गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. रहिवाशांनी अथवा शेतकºयांनी नदीपात्रात जावू नये किंवा आपली जनावरे नदीपात्रात जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. पाण्याचा उपसा करण्यासाठी विद्युत मोटारी बसविल्या असतील तर त्या सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन केले आहे. त्याच प्रमाणे नदीपात्रातील पाण्याचा उपसा होणार नाही, या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत.