वृक्ष संवर्धनासाठी पाणी नियोजन गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:16 AM2021-03-07T04:16:32+5:302021-03-07T04:16:32+5:30
वाॅर्डांमध्ये साफसफाईचा अभाव परभणी : जिल्हा रुग्णालयातील स्त्री रुग्णालय, ऑर्थो विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाॅर्डांमध्ये एका खाटावर दोन रुग्णांवर ...
वाॅर्डांमध्ये साफसफाईचा अभाव
परभणी : जिल्हा रुग्णालयातील स्त्री रुग्णालय, ऑर्थो विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाॅर्डांमध्ये एका खाटावर दोन रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचार घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्याचबरोबर, काही वाॅर्डांमध्ये साफसफाईचाही अभाव दिसून येत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
पूर्णा शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
पूर्णा : शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
ब्राह्मणगाव ते मांडाखळी रस्त्याची दुरवस्था
परभणी : तालुक्यातील ब्राह्मणगाव ते मांडाखळी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र रस्ता दुरुस्तीबाबत कोणतीही पावले उचलली जात नाहीत.
बंद सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी
परभणी : शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी १० ते १५ वर्षांपूर्वी महानगरपालिकेने चौकाचौकात सिग्नल बसविले होते. सध्या सिग्नल बंद असल्याने केवळ ते शोभेचे झाले आहेत. शहरातील वाढलेली वाहतूक लक्षात घेता, सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करावी, अशी मागणी आहे.