देखभाल दुरुस्ती अभावी ३४ गावातील पाणीपुरवठा योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:16 AM2020-12-24T04:16:23+5:302020-12-24T04:16:23+5:30

२५ गावांना योजनाच नाही एकीकडे अनेक गावांमध्ये दोन -दोन,तीन -तीन शासनाच्या योजना आहे. पाणी पुरवठ्यासाठी रेपा, तेलवाडी, नरवाडी, ...

Water supply schemes in 34 villages closed due to lack of maintenance | देखभाल दुरुस्ती अभावी ३४ गावातील पाणीपुरवठा योजना बंद

देखभाल दुरुस्ती अभावी ३४ गावातील पाणीपुरवठा योजना बंद

Next

२५ गावांना योजनाच नाही

एकीकडे अनेक गावांमध्ये दोन -दोन,तीन -तीन शासनाच्या योजना आहे. पाणी पुरवठ्यासाठी रेपा, तेलवाडी, नरवाडी, पूगळा तांडा ,गारखेडा ,मालेगाव, दुधना, चव्हाळी तांडा ,रामनगर तांडा ,येनोली तांडा ,पिंपळगाव आदी तालुक्यातील २५ गावांना शासनाची कोणतीच योजना नाही.

मोठ्या योजनांमध्ये हत्ती पोसणे

जिंतूर तालुक्यात जीवन प्राधिकरणामार्फत सोळा गाव पाणी पुरवठा योजना, बारागाव वस्सा पाणीपुरवठा योजना व तेवीस गाव पिंपळगाव पाणीपुरवठा योजना या योजना केवळ पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार आहे. या योजनेचे पाणी मागच्या १५ वर्षाच्या शेवटच्या गावापर्यंत पोचलेच नाही. भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल ,जलस्वराज या योजनेमध्ये गैरप्रकार झाला. याकडेही जिल्हा परिषद प्रशासन डोळेझाक करीत आहे.

पुढाऱ्यांनी खाल्ल्या योजना

जिंतूर तालुक्यामध्ये पाणी पुरवठा योजनेची कामे अनेक राजकीय कंत्राटदारांनी घेतली. अधिकाऱ्यावर दबाव टाकून योजना पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र हस्तगत केले. मात्र अनेक योजनांमध्ये गैरप्रकार झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर कारवाई होऊ दिली नाही. पुढाऱ्यांचे घरे या योजनेमुळे भरले आहेत.

Web Title: Water supply schemes in 34 villages closed due to lack of maintenance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.