नवीन जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:30 AM2021-03-13T04:30:47+5:302021-03-13T04:30:47+5:30
रस्त्याच्या कामासाठी तोडली झाडे परभणी : गंगाखेडरोड परिसरात रस्त्याचे काम केले जात आहे. रस्ता रूंदीकरण करून सिमेंट काँक्रिटचा रस्ता ...
रस्त्याच्या कामासाठी तोडली झाडे
परभणी : गंगाखेडरोड परिसरात रस्त्याचे काम केले जात आहे. रस्ता रूंदीकरण करून सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार केला जात आहे. या कामासाठी गंगाखेड रोड परिसरातील दोन्ही बाजूची झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे हा परिसर उजाड दिसत आहे.
ऑनलाईन फसवणुकीचे वाढली प्रकार
परभणी : जिल्ह्यात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्याचा दुसरा परिणाम ऑनलाईन फसवणूकही तेवढ्याच प्रमाणात वाढली आहे. बँक अधिकारी असल्याचे सांगत किंवा एटीएमचा पासवर्ड हस्तगत करून फसवणूक केली जात आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतरही अनेक प्रकरणांमध्ये आरोपी मात्र हाती लागले नाहीत.
कर्मचाऱ्यांसाठी कोरोना तपासणी
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून, शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी १६ मार्चपर्यंत आरटीपीसीआरच्या चाचण्या केल्या जात आहेत. शासकीय रुग्णालय तसेच महानगरपालिकेच्या केंद्रांमध्ये चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दुभाजकावरील झाडे वाळू लागली
परभणी : शहरातील वसमत रोड आणि जिंतूर रोड भागातील दुभाजकावर सुशोभीकरणासाठी झाडे लावली आहेत. मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ही झाडे सुकत आहेत. मनपाने या झाडांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
रेडियम बसविल्याने गैरसोय दूर
परभणी : शहरातील वसमत रोडवरील दुभाजकावर काही दिवसांपूर्वी रेडियम बसविण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय दूर झाली आहे. दुभाजक लक्षात न आल्याने यापूर्वी अनेकवेळा या रस्त्यावर अपघात झाले होते. पोलीस अधिकारी जयंत मीना यांच्या संकल्पनेतून हे रेडियम बसविण्यात आले आहेत.