आम्ही कलेक्टरला गिनत नाही, तुम्ही कोण?; वाळू ट्रॅक्टरवरून भाजप नेत्यासह तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 05:11 PM2020-02-22T17:11:27+5:302020-02-22T17:12:10+5:30

गणेश रोकडे यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची फिर्याद

We don't respect collector, who are you ?; BJP leader and thress otjjes charged with three | आम्ही कलेक्टरला गिनत नाही, तुम्ही कोण?; वाळू ट्रॅक्टरवरून भाजप नेत्यासह तिघांवर गुन्हा

आम्ही कलेक्टरला गिनत नाही, तुम्ही कोण?; वाळू ट्रॅक्टरवरून भाजप नेत्यासह तिघांवर गुन्हा

Next

पालम (जि. परभणी) : अवैधरीत्या वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात आणल्यानंतर हे ट्रॅक्टर सोडून देण्याच्या कारणावरून तहसीलदार ज्योती चव्हाण व नायब तहसीलदार मंदार इंदूरकर यांच्यासोबत वादावादी करून त्यांच्या टेबलवरील कागदपत्रे हिसकावण्याचा प्रयत्न करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेश रोकडे यांच्यासह तीन जणांवर पालम पोलीस ठाण्यात गुरुवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. 

या संदर्भात पालम तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार मंदार इंदूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘२० फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात कामकाज करीत असताना दुपारी ३़४५ च्या सुमारास तहसीलदार ज्योती चव्हाण यांच्या कक्षासमोर ७ ते ८ व्यक्ती आले़ त्यामध्ये भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेश रोकडे, चोरवड येथील रुपला सीताराम राठोड व सीताराम रुपला राठोड हे कोणतीही पूर्वसूचना न देता तहसीलदार चव्हाण यांच्या कक्षात आले व रोकडे यांनी आमचा कार्यकर्ता सीताराम राठोड याचे ट्रॅक्टर का पकडले, असे म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व तुमचा इंदूरकर का फिंदूरीकर कुठे आहे, अशी विचारणा केली़ त्यावेळी इंदूरकर यांनी पुढे येऊन मीच इंदूरकर असल्याचे सांगितले़ त्यावर रोकडे यांनी तू मला ओळखत नाहीस का, माझ्यावर यापूर्वी ४३ गुन्हे दाखल आहेत, असे सांगितले़’

आम्ही कलेक्टरला गिनत नाही, तुम्ही कोण? 
तहसीलदार चव्हाण यांनी शांतता राखा, हे शासकीय कार्यालय आहे, असे रोकडे यांना सांगितले असता, त्यांनी आम्ही कलेक्टरला गिनत नाही, तुम्ही कोण? उद्या तहसीलवर मोर्चा आणतो़ तुमचे आॅफिस बंद पाडतो, असे म्हणत हातवारे करीत रोकडे व त्यांचे साथीदार अंगावर धावून येऊ लागले़, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी रुपला राठोड यांनी इंदूरकर यांना तू काय कागदं काळे करीत बसलास, असे म्हणून त्यांच्या टेबलवर ठेवलेले शासकीय कागदपत्रे हिसकावण्याचा प्रयत्न केला़ यावेळी अव्वल कारकून प्रकाश बोराडे, भारत घनसावंत, लिपिक वैजनाथ फड हे कक्षात दाखल झाले़ त्यांनी रोकडे व त्यांच्या सहकाऱ्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला़ याबाबत पालम पोलिसांत इंदूरकर यांनी गुरुवारी मध्यरात्री फिर्याद दिली. यावरुन गणेश रोकडे, रुपला सीताराम राठोड व सीताराम रुपला राठोड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

Web Title: We don't respect collector, who are you ?; BJP leader and thress otjjes charged with three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.