ग्रामीण भागात पुन्हा लग्नसमारंभाचे थाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:15 AM2020-12-29T04:15:15+5:302020-12-29T04:15:15+5:30

पाथरी : कोरोनाच्या महामारीत शेतवस्ती आणि वाड्यावर छोटेखानी होणारे लग्नसमारंभ ८ महिन्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीण भागात धुमधडाक्यात सुरू झाले ...

Wedding ceremonies in rural areas | ग्रामीण भागात पुन्हा लग्नसमारंभाचे थाट

ग्रामीण भागात पुन्हा लग्नसमारंभाचे थाट

Next

पाथरी : कोरोनाच्या महामारीत शेतवस्ती आणि वाड्यावर छोटेखानी होणारे लग्नसमारंभ ८ महिन्यानंतर पुन्हा एकदा ग्रामीण भागात धुमधडाक्यात सुरू झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

कोविड-१९ चा धसका जगाने घेतला. त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाले. आठ महिन्यानंतर हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने फिजिकल डिस्टन्स, आयसोलेशेन, हात स्वच्छ धुणे, मास्कचा वापर आदी अटी घालून लग्नसमारंभ व इतर सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली. मात्र ग्रामीण भागात सद्यस्थितीत लग्न समारंभ धुमधडाक्यात साजरे होत आहेत. या लग्नसमारंभात वाढणारी गर्दी चिंतेचा विषय बनली आहे. मात्र याबाबत कोणीही विचारणा करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे जिल्हा, तालुका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Wedding ceremonies in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.