सेलू (परभणी)येथे गजल, मुशायºयास रसिकांची दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:16 PM2017-12-25T23:16:28+5:302017-12-25T23:16:40+5:30

शब्द सह्याद्री प्रतिष्ठान, एल्गार सामाजिक, साहित्य परिषद आणि गझलनिष्ठ प्रतिष्ठानच्या वतीने सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या कै.रा.ब.गिल्डा सभागृहात मराठी गझल, मुशायरा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Welcome to Gazal, Musa, at Selu (Parbhani) | सेलू (परभणी)येथे गजल, मुशायºयास रसिकांची दाद

सेलू (परभणी)येथे गजल, मुशायºयास रसिकांची दाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : शब्द सह्याद्री प्रतिष्ठान, एल्गार सामाजिक, साहित्य परिषद आणि गझलनिष्ठ प्रतिष्ठानच्या वतीने सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या कै.रा.ब.गिल्डा सभागृहात मराठी गझल, मुशायरा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गझलकार नाना बेरगुडे मंचावर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनंदाताई पाटील उपस्थित होत्या. प्रा.डॉ.अशोक पाठक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सर्जेराव लहाने, नगरसेवक रहिम खान पठाण, कॉ. अशोक उफाडे आदींची उपस्थिती होती. यावेळी ‘भावास सोबतीला घेऊन चालले मी, पुसले मला जगाने हा यार कोण आहे’, ही गझल सुनंदाताई पाटील यांनी सादर करुन पुरुषांनी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन मांडला. नारायण सुंदरसे यांनी ‘तू वेदना झालीस, अन् तू अस्वांची प्रार्थना, गाऊन, घेतो मी तुला गझलेतल्या शब्दांसवे’ ही गझल सादर केली. भूषण आहीर यांनी ‘आजन्म वेदनने कित्येक वार केले, आकार घेतला मग माझ्यातल्या कविने’ तर सचिन तारु यांनी ‘भूक हसता खोल पोटी, दैवही घेते कसोटी’ ही गझल सादर केली. आत्तम गेंदे यांनी ‘बाप नभाला बघुनी विठ्ठल विठ्ठल म्हणतो, पुष्पक नाही हुडक तो ढग शोधत असतो’, ही गझल सादर केली. तर अश्विनी विटेकर यांनी ‘वेदनेचे शेत आहे, दु:ख ताजे देत आहे’, ही गझल सादर केली. रत्नाकर जोशी यांनीही गझल सादर केली. सुरेश हिवाळे, शरद ठाकर, दिगंबर रोकडे या कवींनीही गझल सादर करुन या मनमुराद हसविले.
या कार्यक्रमात प्रा.के.डी. वाघमारे यांना राज्य शासनाचा यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. अरविंद सगर यांनी सूत्रसंचालन केले. एकनाथ जाधव यांनी आभार मानले.

Web Title: Welcome to Gazal, Musa, at Selu (Parbhani)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.