जन आशीर्वाद यात्रेचे शहरात ११ ठिकाणी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:23 AM2021-08-19T04:23:15+5:302021-08-19T04:23:15+5:30
जन आशीर्वाद यात्रेचे पाथरी रोडवरील विसावा कॉर्नर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर गणपती चौक, महाराणा प्रताप चौक, जाम ...
जन आशीर्वाद यात्रेचे पाथरी रोडवरील विसावा कॉर्नर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर गणपती चौक, महाराणा प्रताप चौक, जाम नाका, सुमनताई गव्हाणे शाळा, उड्डाणपूल परिसर, अण्णाभाऊ साठे पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा फुले पुतळा व यानंतर माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत करण्यात आले.
शहरात दाखल होताच जिप्सीतून प्रवास
जिंतूरकडून पाथरी रोडवरील विसावा कॉर्नरपर्यंत ताफ्यातील वाहनातून प्रवास केल्यानंतर डॉ. कराड यांनी जिप्सी वाहनात प्रवेश केला. मोकळ्या जिप्सी वाहनात उभे राहून शहरातील प्रत्येक चौकामध्ये नागरिकांनी केलेले सत्कार त्यांनी स्विकारले. यावेळी आमदार मेघना बोर्डीकर, आ.अतुल सावे, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्या हस्ते शिलाई मशिनचे वाटप व अन्य उपक्रम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केले होते.
ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी
जिंतूर रोड ते वसमत रोड यादरम्यान रात्री ७ ते ८.३० वाजेपर्यंत शिवाजी महाविद्यालयाच्या कार्यक्रमस्थळी पोहचेपर्यंत सर्वच मार्गावर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. अनेक ठिकाणची वाहतूक या मार्गावर बंद केली होती. यामुळे नागरिक काही वेळ ताटकळत वाहतूक कोंडीत अडकले. दरम्यान, अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ रस्त्यावर लावलेल्या फटाक्यांच्या लडीमुळे होणाऱ्या आवाजाने व ठिणगीने अनेकांना अडथळा झाला.