तुमचं खरं नाव काय आहे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:09 AM2020-12-28T04:09:54+5:302020-12-28T04:09:54+5:30

सव्वीस वर्षाखालील सर्व उमेदवारांना सातवी उत्तीर्ण बंधनकारक देवगाव फाटा : ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या २६ वर्षाखालील म्हणजे १ जानेवारी ...

What is your real name | तुमचं खरं नाव काय आहे...!

तुमचं खरं नाव काय आहे...!

Next

सव्वीस वर्षाखालील सर्व उमेदवारांना सातवी उत्तीर्ण बंधनकारक

देवगाव फाटा : ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या २६ वर्षाखालील म्हणजे १ जानेवारी १९९५ नंतर जन्म झालेल्या सर्व उमेदवारांना ग्रा.पं.सदस्यांसाठी नामनिर्देशन अर्ज करणेसाठी सातवी उत्तीर्ण असणे बंधनकारक केल्यामुळे अंगठेबहाद्दर इच्छुकांची मात्र पंचाईत झाली आहे. तर २६ वर्षावरील सर्व उमेदवारांसाठी ही अट लागू राहणार नाही असे स्पष्ट केल्यामुळे पात्र उमेदवाराचा शोध घेताना दुसरीकडे मात्र पॅनलप्रमुखांची दमछाक होताना दिसत आहे.

फसव्या काॅलपासून सावध रहा.

देवगाव फाटा : ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढत असून विविध आर्थिक आमिष दाखवत मोबाईलवरून आधारकार्ड, पॅनकार्ड,बँक पासबुक माहितीची विचारणा करून नागरिकांना ऑनलाईन गंडविले जात आहे. अशा फसव्या काॅलपासून नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन सेलू पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

हायकोर्ट रेल्वे सुरू झाल्याने समाधान.

देवगाव फाटा :मराठवाड्यातील प्रवाशांची मुख्य मदार असलेल्या नांदेड - मनमाड ही हायकोर्ट रेल्वे गुरुवार पासून सुरू केल्याने औरंगाबाद व नांदेड मार्गावरील प्रवाशांना ये जा करीता ही रेल्वे सेवा सोईची झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. मराठवाड्यातील प्रवाशांची मुख्य मदार असलेल्या नांदेड - मनमाड ही हायकोर्ट रेल्वे गुरुवारपासून सुरू केल्याने औरंगाबाद व नांदेड मार्गावरील प्रवाशांना ये जा करीता ही रेल्वेसेवा सोईची झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

शेकोट्या पेटू लागल्या

देवगाव फाटा : सेलू शहर व ग्रामीण भागात मागील १५ दिवसात चांगली थंडी पडत असल्याने स्वेटर,मफलर,कानटोपीचा वापर वाढला आहे.त्यातच सकाळी व सायंकाळी शरीराला उब मिळावी यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. या शेकोट्यावर रात्री उशिरापर्यंत निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत.

रानडुकराची धास्ती वाढली

देवगाव फाटा : सेलू तालुक्यातील ग्रामीण भागात शेत जमिनीवर रानडुक्करांचा वावर वाढला असून शेतातील रब्बी पिकांची रानडुक्कर हे नुकसान करीत असल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

Web Title: What is your real name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.