सेलूत गव्हाचा पेरा तीन पटीने वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:43 AM2020-12-11T04:43:32+5:302020-12-11T04:43:32+5:30

देवगावफाटा: तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने गव्हाचा पेरा तीन पटीने वाढला असून सद्यस्थितीत रब्बीच्या ६४ टक्के पेरण्या पूर्ण ...

Wheat sowing in Selut tripled | सेलूत गव्हाचा पेरा तीन पटीने वाढला

सेलूत गव्हाचा पेरा तीन पटीने वाढला

Next

देवगावफाटा: तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने गव्हाचा पेरा तीन पटीने वाढला असून सद्यस्थितीत रब्बीच्या ६४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

सेलू तालुक्यात रब्बी हंगामात ४८ हजार १९० हेक्टर जमिनीचे पेरणीलायक क्षेत्र आहे. रब्बी हंगामात प्रत्यक्षात ३० हजार ८८२ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी करण्यात आलेली आहे. यामध्ये ६ हजार ९६५ हेक्टर जमिनीवर गव्हाचा पेरा झाला असून १५ हजार ६०९ हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाला आहे. ८ हजार ९५ हेक्टरवर हरभरा पेरण्यात आला असून करडई १४५ हेक्टरवर पेरण्यात आली आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत तालुक्यात गव्हाचा पेरा तीन पटीने वाढला आहे. तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे गव्हाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. गतवर्षी फक्त २ हजार १९० हेक्टर जमिनीवर गव्हाचा पेरा झाला होता. जो यावर्षी ६ हजार ९६५ हेक्टरवर झाला आहे. गतवर्षी ३४ हजार ७९० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. यावर्षी ज्वारीच्या पेऱ्यात घट झाला आहे. तालुक्यातील सिंचन विहिरींना चांगले पाणी आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकांची स्थितीही समाधानकारक आहे. चिंतेची बाब म्हणजे तालुक्यात तुरीचे पीक पिवळे पडत आहे. शिवाय या पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यासाठी कृषी विभागाचे अधिकारी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. त्यामध्ये कृषी निविष्ठांचा वापर कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच करावा, अशा सचूना करण्यात येत आहेत.

तृणधान्य घटले; कडधान्य वाढले

गतवर्षी सेलू तालुक्यात ज्वारी, गहू, मका हे तृणधान्य ३७ हजार ७० हेक्टरवर पेरण्यात आले होते. यावर्षी मात्र हा पेरा २२ हजार ७०५ हेक्टरवर आला आहे. म्हणजेच जवळपास १४ हजार ३६५ हेक्टरची यामध्ये घट झाली आहे. गतवर्षी हरभरा व इतर कडधान्य ५ हजार ६८० हेक्टरवर पेरण्यात आले होते. यावर्षी ८ हजार ९५ हेक्टरवर कडधान्याची लागवड करण्यात आली आहे. जवळपास २ हजार ४१५ हेक्टरची यामध्ये वाढ झाली आहे. याशिवाय करडई, जवस, सूर्यफूल आदी गळीत धान्य गतवर्षी ५ हजार ४४० हेक्टरवर पेरण्यात आले होते. यावर्षी फक्त २३७ हेक्टरवरच याची पेरणी करण्यात आली आहे. एकंदर शेतकऱ्यांनी पाणी उपलब्धतेनुसार गहू व हरभरा आदी पिकांना प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

तुरीचे पीक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासाठी कृषी सहाय्यकांचे मार्गदर्शन घेऊन योग्य मात्रांची फवारणी करावी. सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आदेश कृषी सहाय्यकांना देण्यात आले आहेत.

-आनंद कांबळे, तालुका कृषी अधिकारी, सेलू

Web Title: Wheat sowing in Selut tripled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.