रेल्वेचे मासिक पास कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:21 AM2021-09-24T04:21:47+5:302021-09-24T04:21:47+5:30

सध्या सुरू असलेल्या रेल्वे नांदेड-मुंबई (तपोवन) नांदेड-अमृतसर (सचखंड) नांदेड-पनवेल नांदेड-पुणे (साप्ताहिक) नांदेड-मुंबई (राज्यराणी) आदिलाबाद-मुंबई (नंदीग्राम) सिकंदराबाद-मुंबई (देवगिरी) मुंबईत सवलत, ...

When will the monthly train pass start? | रेल्वेचे मासिक पास कधी सुरू होणार?

रेल्वेचे मासिक पास कधी सुरू होणार?

googlenewsNext

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

नांदेड-मुंबई (तपोवन)

नांदेड-अमृतसर (सचखंड)

नांदेड-पनवेल

नांदेड-पुणे (साप्ताहिक)

नांदेड-मुंबई (राज्यराणी)

आदिलाबाद-मुंबई (नंदीग्राम)

सिकंदराबाद-मुंबई (देवगिरी)

मुंबईत सवलत, आम्हाला का नाही?

मुंबईमध्ये लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. लोकलमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मासिक पास दिला जात आहे. हाच नियम दक्षिण मध्य रेल्वे विभागाने विभागातील विशेष रेल्वेंना लागू करावा व प्रवाशांची गैरसोय दूर करावी.

स्टेशन मास्तरचा कोट

दक्षिण मध्य रेल्वे विभागातील परभणीमार्गे धावणाऱ्या ४ डेमू रेल्वेमध्ये मासिक पास असलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. उर्वरित विशेष रेल्वे आरक्षित असल्याने या रेल्वेत प्रवाशांना बसण्यास परवानगी नाही.

- अरविंद इंगोले, स्टेशन मास्टर, परभणी.

भुर्दंड किती दिवस सहन करायचा?

पूर्णा ते नांदेड दररोज येणे-जाणे करण्यासाठी मासिक पास आर्थिकदृष्ट्या परवडतो. मात्र, डेमू रेल्वेच्या वेळा ये-जा करण्यासाठी सोयीच्या नाहीत. यामुळे विशेष रेल्वेला प्रवास करण्याचे लागू करावे.

- विनोद काळे, पूर्णा.

परभणी-नांदेड मार्गावर जवळपास ७०० ते ८०० प्रवासी दररोज कोरोनापूर्वी अप-डाऊन करायचे. अशा सर्वांचीच सध्या गैरसोय होत आहे. यामुळे विशेष रेल्वेला मासिक पास लागू करावा.

- बालाजी खंडागळे, परभणी.

सेलू, मानवत, गंगाखेड मार्गावर डेमू रेल्वेच्या वेळा प्रवाशांच्या सोयीच्या नाहीत. यामुळे अप-डाऊन करणाऱ्या शासकीय नोकरदारांना व खासगी नोकरदारांना बस व खासगी वाहनाने जावे लागत आहे.

- विनोद पाटील, परभणी.

डेमूच्या वेळा गैरसोयीच्या

डेमू रेल्वे नांदेड-रोटेगाव, परळी-अकोला, रोटेगाव-नांदेड या रेल्वेच्या वेळा अप-डाऊन करणाऱ्यांसाठी गैरसोयीच्या आहेत. सकाळी ६ ते १० व रात्री ६ ते १० परभणी-नांदेड, सेलू-मानवत, गंगाखेड-परळी मार्गावर धावणाऱ्या विशेष रेल्वेला अप-डाऊन करणाऱ्यांना बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: When will the monthly train pass start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.