'सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी कधी होईल?' मराठा आरक्षणासाठी युवकाने संपवले जीवन
By ज्ञानेश्वर भाले | Published: February 10, 2024 04:16 PM2024-02-10T16:16:48+5:302024-02-10T16:18:53+5:30
सगेसोयरे कायदा पारीत होणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे; सुसाइड नोटमध्ये आढळला मजकूर
सेलू (जि. परभणी) : सेलूतील राजवाडीत शनिवारी सकाळी साडेनऊला एका तरुणाने बटईच्या शेतात पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रताप शेवाळे असे २७ वर्षीय आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरील पुराव्याने ही आत्महत्या मराठा आरक्षणामुळे झाल्याचे पुढे येत आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ओव्हाळ, पो.नि. प्रभाकर कवाळे, पोलीस हवालदार शिवदास सुर्यवंशी यांनी घटनास्थळी केलेल्या पंचनामा केला. मयत प्रताप शेवाळे यांच्या खिशात सापलेल्या चिठ्ठीत सापडली. यात माझ्या मराठा समाजाला पक्के आरक्षण मिळण्यासाठी सगेसोयरे कायदा पारीत होणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. या कारणामुळे मी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख चिठ्ठीत आहे. शेवविच्छेदनासाठी मृतदेह सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुल असा परिवार आहे. प्रताप शेवाळे हा एकूलता एक असल्याने या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.