जिल्ह्यातील आरोग्य सुविधेला अधिक भक्कम करणार : पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:17 AM2021-08-01T04:17:49+5:302021-08-01T04:17:49+5:30
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२०-२१ साठी मंजूर केलेला निधी संबंधित योजनांवर ९९.२४ टक्के खर्च झाला ...
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२०-२१ साठी मंजूर केलेला निधी संबंधित योजनांवर ९९.२४ टक्के खर्च झाला यात कोविडसाठी ३० कोटी ९ लक्ष ९ हजार खर्च करण्यात आला. यात जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाअंतर्गत १७ कोटी ३४ लक्ष ३१ हजार, तर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषदेअंतर्गत १२ कोटी ७४ लक्ष ७८ हजार निधी खर्च करण्यात आला. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी २२५ कोटी तरतूद मंजूर असून, जुलै २०२१ अखेर यातील ३० कोटी ७४ लक्ष १२ हजार रुपये खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ६० कोटी रुपये, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी २ कोटी १६ लक्ष ५६ हजार रुपयांची तरतूद मंजूर केली आहे. शासनाच्या निर्देशानुसार २२५ कोटी निधीच्या ३० टक्के निधी हा कोविड प्रतिबंधक उपाययोजनेसाठी करावयाचा आहे.
८० हजार हेक्टवरील पिकांचे नुकसान
जिल्ह्यात अतिवृष्टीने गेल्या महिन्यात ८० हजार ६५८ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून, १२०० घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तसेच २३६ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत शासनाने दिली आहे. अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमानुसार मदत देण्यात येणार असून, राज्य शासनामार्फतही अतिरिक्त मदत देण्याची बाब विचाराधीन असल्याचे यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री मलिक म्हणाले. जिल्ह्यात अतिवृष्टीने रस्ते, पूल यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील इमारतीसाठी राज्याच्या अल्पसंख्याक विभागाकडून १८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
मुगळीकर यांच्या कार्याचा गौरव
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री मलिक यांनी मावळते जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या कार्याचा गौरव केला. कोविडसारख्या आव्हानात्मक काळात मुगळीकर यांनी उत्कृष्ट सेवा दिली. त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील, असेही मलिक म्हणाले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना मुगळीकर भावुक झाले होते.