महिला, बांगड्यांना कमी लेखू नका-रुपालीताई चाकणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 10:23 PM2020-03-01T22:23:45+5:302020-03-01T22:25:06+5:30
बांगड्या हे महिलांचे आभूषण आहे़ समाजात स्त्री शिक्षणाचा जागर करणाऱ्या सावित्रीबाई फुले, राजामाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाज परिवर्तनाची मोठी कामे केली़ महिशासूर दैत्याचा वध करणाºया देवीनेही बांगड्याच घातल्या होत्या़ त्यामुळे बांगड्यांना कमी लेखू नका, असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : बांगड्या हे महिलांचे आभूषण आहे़ समाजात स्त्री शिक्षणाचा जागर करणाऱ्या सावित्रीबाई फुले, राजामाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाज परिवर्तनाची मोठी कामे केली़ महिशासूर दैत्याचा वध करणाºया देवीनेही बांगड्याच घातल्या होत्या़ त्यामुळे बांगड्यांना कमी लेखू नका, असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
परभणी शहरातील राष्ट्रवादी भवन येथे रविवारी राष्ट्रवादी महिला संवाद मेळावा पार पडला़ या मेळाव्यात चाकणकर बोलत होत्या़ यावेळी महिला राष्टÑवादी काँग्रेसच्या राष्टÑीय अध्यक्षा फौजिया खान, जि.प. अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, राष्टÑीय सचिव सोनालीताई देशमुख, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष रितेश काळे, प्रेक्षाताई भांबळे, शहर जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के, राविकाँचे जिल्हाध्यक्ष सुमंत वाघ, सभापती अनिल नखाते, महिला राकाँच्या जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते, शहराध्यक्षा नंदाताई राठोड, रेखा आवटे, कमल राठोड, रेखाताई फड, परवीन कौसर, शेख मुमताज आदींची उपस्थिती होती.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी आम्ही शिवसेनेनेप्रमाणे हातात बांगड्या घातल्या नाहीत, असे वक्तव्य केले होते़ या वक्तव्यावरून रुपालीताई चाकणकर यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली़ त्या म्हणाल्या, भाजपा सरकारच्या काळात महिलांवर अत्याचार वाढले़ महिलांविषयी अपशब्द वापरणाºया आमदारांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे, असे असताना या आमदारांना पाठीशी घालण्याचे काम भाजपाने केले़ त्यावरुन भाजपाची संस्कृती काय आहे, हे लक्षात येते़ आमच्या सरकारच्या काळात महिलांना सुरक्षा दिली जात आहे़ त्यांच्यावर अत्याचार होणार नाहीत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ महिलांंना न्याय मिळवून देण्यासाठी आगामी काळात राज्यातील प्रत्येक तालुक्यात महिला दक्षता समिती स्थापन केली जाणार आहे, असे चाकणकर यांनी यावेळी सांगितले. राष्टÑीय अध्यक्ष फौजिया खान यांनी अध्यक्षीय समारोप केला. महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा भावनाताई नखाते यांनी प्रास्ताविक केले. संदीप माटेगावकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राकाँच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.
संघटन वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करा
४जिल्ह्यात राष्टÑवादी काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करावेत़ संघटना ही शिडीसारखी काम करत असते. प्रत्येकाने एकमेकांना आधार दिला पाहिजे. विशेष म्हणजे, संघटनचे काम करताना आत्मविश्वास वाढविणे तेवढेच गरजेचे आहे़ तेव्हा पदाधिकाºयांनी गावपातळीवर जावून काम करावे़ महिलांची ताकद वाढली तर पक्ष मजबूत होईल, असे चाकणकर म्हणाल्या़