आधुनिक तंत्रज्ञानातून महिला सक्षमीकरण शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:33 AM2020-12-15T04:33:34+5:302020-12-15T04:33:34+5:30

पशू वैद्यकीय महाविद्यालय परभणी व भारतीय महिला पशू वैद्यक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ व्या दोन दिवसीय राष्ट्रीय ...

Women empowerment through modern technology | आधुनिक तंत्रज्ञानातून महिला सक्षमीकरण शक्य

आधुनिक तंत्रज्ञानातून महिला सक्षमीकरण शक्य

Next

पशू वैद्यकीय महाविद्यालय परभणी व भारतीय महिला पशू वैद्यक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ व्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ११ डिसेंबर रोजी या परिसंवादाच्या समारोप प्रसंगी प्रा. व्ही.डी. आहेर बोलत होते. या समारोप कार्यक्रमास प्रा. डॉ. एन.व्ही. कुरकुरे, डॉ. मीनाक्षी प्रसाद, डाॅ. करुणानिधी, डॉ. मधू स्वामी, डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. दीपाली पाटील यांची उपस्थिती होती. या परिसंवादामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पशू संवर्धनातील उपजीविका संधीची माहिती, अधिकाधिक ग्रामीण महिलांपर्यंत पोहचविणे ही आजची गरज आहे. त्या दृष्टीने महिला पशू वैद्यकाचे योगदान ही सामाजिक बदलाची नांदीच असल्याचे मत हरियाणा येथील हिसारच्या पशू जैव तंत्रज्ञान विभागाच्या प्रा. डॉ. मीनाक्षी प्रसाद यांनी यावेळी व्यक्त केले. दोन दिवस चाललेल्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. इरावती सरोदे यांनी केले. डॉ. दीपाली पाटील यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी डॉ. संजय लोंढे, डॉ. संदीप रिठ्ठे, डॉ. रुपेश वाघमारे, डॉ. गोविंद गगने यांच्यासह स्थापन केलेल्या विविध समितीच्या सदस्यांनी प्रयत्न केले.

Web Title: Women empowerment through modern technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.