महिलांनी रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:19 AM2021-03-01T04:19:35+5:302021-03-01T04:19:35+5:30
मानवत : रमाबाई आंबेडकरांचा त्याग अवर्णनीय आहे. त्याला शब्दात मांडणे शक्य नाही. स्वत:झिजून रमाबाईंनी आपल्या सर्वांना मायेची सावली दिली. ...
मानवत : रमाबाई आंबेडकरांचा त्याग अवर्णनीय आहे. त्याला शब्दात मांडणे शक्य नाही. स्वत:झिजून रमाबाईंनी आपल्या सर्वांना मायेची सावली दिली. त्यांचा आदर्श प्रत्येक भारतीय स्त्रीने डोळ्यासमोर ठेवावा, असे प्रतिपादन सहायक कोषागार अधिकारी ज्योती बगाटे यांनी केले.
शहरातील बुद्धनगर येथे २७ फेब्रुवारी रोजी रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बगाटे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अनंत भदर्गे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना जोंधळे, कोषागार अधिकारी ज्योती बगाटे, अनिता सरोदे, रेखाताई मनेरे, डॉ. प्रवीण कनकुटे, विश्वजित वाघमारे यांची उपस्थिती होती. भारतीय संविधानामुळे आपल्या जगण्यासाठी मोकळा श्वास मिळाला. हा श्वास मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ रमाबाईंमुळेच घडले असल्याचे ज्योती बगाटे म्हणाल्या. वनिता खंदारे या विद्यार्थिनीने रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर एकपात्री प्रयोग सादर केला. वंदना जोंधळे यांनी प्रास्ताविक केले, तर विजय खरात यांनी सूत्रसंचालन केेले.