परभणीत ११ केंद्रांचा कारभार पाहणार महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:50 AM2019-04-18T00:50:04+5:302019-04-18T00:50:31+5:30

लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने या मतदार संघात ११ सखी मतदान केंदे्र स्थापन करण्यात आली आहेत. मतदान केंद्राध्यक्षांपासून ते सेवकांपर्यंतचा सर्व कारभार महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे.

Women will control 11 Parbhani centers | परभणीत ११ केंद्रांचा कारभार पाहणार महिला

परभणीत ११ केंद्रांचा कारभार पाहणार महिला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने या मतदार संघात ११ सखी मतदान केंदे्र स्थापन करण्यात आली आहेत. मतदान केंद्राध्यक्षांपासून ते सेवकांपर्यंतचा सर्व कारभार महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे.
लोकसभेच्या यंदाच्या निवडणुकीत निवडणूक विभागाने वेगवेगळे बदल करून समाजातील प्रत्येक घटकाला निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यातूनच सखी मतदान केंद्र ही संकल्पना राबविली जाणार आहे. जिल्ह्यात असे ११ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये जिंतूर, परभणी आणि परतूर मतदार संघात प्रत्येकी १, गंगाखेड-पाथरी मतदार संघात प्रत्येकी ३ आणि घनसावंगी मतदार संघात दोन सखी मतदान केंद्र कार्यरत असतील.
परभणी शहरामध्ये एकता कॉलनी भागातील गांधी विद्यालयाच्या मतदान केंद्राला सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले आहे.
या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षा म्हणून विजया पवार यांची नियुक्ती झाली असून मतदान केंद्र अधिकारी म्हणून सुप्रिया श्रीमाळी, छाया गायकवाड, विद्या लटपटे काम पाहणार आहेत. त्याच प्रमाणे निशा कापसे यांची सहाय्यक अधिकारी म्हणून तर वैशाली पेटकर यांची सेविका म्हणून या केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Women will control 11 Parbhani centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.