परभणी जिल्ह्यातील १४८ सिंचन विहिरींची कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:20 AM2019-12-21T00:20:24+5:302019-12-21T00:20:47+5:30

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत २०१८-१९ या आर्थिक वर्षात ८६० विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी १४८ विहिरींची कामे पूर्ण झाली असून २०२ विहिरींची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Work on 3 irrigation wells in Parbhani district | परभणी जिल्ह्यातील १४८ सिंचन विहिरींची कामे पूर्ण

परभणी जिल्ह्यातील १४८ सिंचन विहिरींची कामे पूर्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत २०१८-१९ या आर्थिक वर्षात ८६० विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी १४८ विहिरींची कामे पूर्ण झाली असून २०२ विहिरींची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी राबविण्यात येत असलेली अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना या दोन योजना स्वतंत्रपणे न राबवता एकत्ररित्या राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून सध्याची प्रचलित विशेष घटक योजना डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या नावाने राबविण्यास शासनाने २७ एप्रिल २०१६ रोजी मान्यता दिली. या योजनेमध्ये नवीन विहिरींसाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान व जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, इनवेल बोअरिंगसाठी २० हजार रुपये, पंप संचासाठी २५ हजार रुपये, वीज जोडणी आकारासाठी १० हजार रुपये तर शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी १ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत ४८९ नवीन विहिरींना मंजुरी देण्यात आली. तर ३७१ इतर बाबींसाठी मंजुरी दिली.२५ फेब्रुवारी २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत लाभार्थ्यांना विहीर खोदकामासाठी मुदत देण्यात आली. मुदतीत विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. आतापर्यंत १४८ विहिरींची कामे लाभार्थ्यांकडून पूर्ण करण्यात आली आहेत. तर २०२ विहिरींची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. ३१ मार्च २०२० पर्यंत उर्वरित विहिरींची कामे पूर्ण करण्यावर भर राहील, अशी माहिती कृषी विकास कार्यालयाकडून मिळाली.
प्रत्येक तालुक्यासाठी : घेतले स्वतंत्र मार्गदर्शन शिबीर
४जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील २०१८-१९ मधील लाभार्थ्यांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी २६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
४या शिबिरात २०१८-१९ मधील नवीन विहीर व इतर बाब लाभार्थ्यांमधील अपूर्ण लाभ दिलेल्या व अद्याप लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. त्यानंतर लाभार्थ्यांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी जि.प.चे कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी मार्गदर्शन केले.
यावर्षी ४५९ विहिरींना दिली मंजुरी
४जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील २०१९-२० मधील लाभार्थी निवडीसाठी १५ दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या कै.बाबुराव पाटील गोरेगावकर सभागृहात सीसीटीव्हीच्या निगराणीत सोडत घेण्यात आली. यामध्ये ४५९ सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आली तर इतर बाबींमध्ये २४५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या लाभार्थ्यांना कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून निवडपत्र देण्याचे काम सुरु आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील गतवर्षी लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांची कामे पूर्ण करुन घेण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. येत्या १५ ते २० दिवसांत यावर्षीच्या लाभार्थ्यांच्या विहिरींची कामे सुरु होतील.
-हनुमंत ममदे, कृषी विकास अधिकारी, जि.प.

Web Title: Work on 3 irrigation wells in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.