महसूल मंडळाची पुनर्रचना होऊनही काम सुरु होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:33 AM2020-12-16T04:33:04+5:302020-12-16T04:33:04+5:30
महसूल विभाग हा ग्रामीण भागातील शासनाचा मुख्य घटक आहे. गावपातळीवर महसूल विभागाकडून शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केल्या जाते. ...
महसूल विभाग हा ग्रामीण भागातील शासनाचा मुख्य घटक आहे. गावपातळीवर महसूल विभागाकडून शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केल्या जाते. अतिवृष्टी दुष्काळ आणि इतर सर्वेक्षण याच विभागाकडून केल्या जाते. जमिनीच्या सर्व व्यवहाराशी तलाठी यांचा सातत्याने संबंध येतो. वर्षानुवर्षे तलाठी सज्जे आणि महसूल मंडळ कार्यरत आहेत. मात्र सज्जा आणि मंडळात गावांची संख्या अधिक असल्याने ग्रामस्थांना कामासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर महसूल आणि हवामान खात्याचा कामकाजवरही परिणाम जाणवत आहे. त्यामुळे राज्य शासनाने कामात सुसूत्रता यावी आणि नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी जुन्या तलाठी सज्जे आणि महसूल मंडळाची नव्याने पुनर्रचना केली आहे. त्यानुसार कामकाज सुरू होणे अपेक्षित होते. मात्र महसूल मंडळाकडून अंमलबजावणी झाली नसताना हवामान खाते आणि कृषी विभागाने एक पाऊल पुढे जात नव्याने स्थापन झालेल्या महसूल मंडळानुसार काम काज सुरू झाले आहे. मात्र ज्या महसूल विभागाने नव्याने ५ महसूल मंडळाची पुनर्रचना केली. त्या महसूल विभागाकडून अंमलबजावणी होत नाही.
नव्या महसूल मंडळानुसार अनुदान
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान वाटप करण्यासाठी कृषी विभागाने नव्याने स्थापित झालेल्या महसूल मंडळानुसार सर्वेक्षण करून याद्या बनविल्या आहेत. त्याच बरोबर खरिप आणि रब्बी हंगामातील पेरणी अवहाल ही नव्याने स्थापीत मंडळानुसार करण्यात आले आहे. यामध्ये पाथरी ,हदगाव बु ,बाभळगाव आणि कासापुरी, मानवत तालूक्यातील मानवत, कोल्हा , मानवत , ताडबोरगाव , केकरजवळा , रामपुरी बु, सोनपेठ तालूक्यातील सोनपेठ,अवलगाव , शेळगाव ,वडगावसोनपेठ - अवलगाव , शेळगाव ,वडगाव या महसूल मंडळाचा समावेश आहे. पाथरी उपविभागात कासापुरी (पाथरी), ताडबोरगाव, रामपुरी बु ( मानवत) आणि शेळगाव ,वडगाव ( सोनपेठ ) हे पाच मंडळ स्थापन करण्यात आले आहेत.