काम फ्रंटलाईनचे मात्र सुरक्षेचा बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:12 AM2021-04-29T04:12:58+5:302021-04-29T04:12:58+5:30
शहरातील वाढत्या रुग्णसंख्येला कमी करण्यासाठी रस्त्यावर उतरून कारवाई करण्याचे काम महापालिका कर्मचारी करीत आहेत. सध्या शहर स्वच्छतेसाठी २५० कर्मचारी ...
शहरातील वाढत्या रुग्णसंख्येला कमी करण्यासाठी रस्त्यावर उतरून कारवाई करण्याचे काम महापालिका कर्मचारी करीत आहेत. सध्या शहर स्वच्छतेसाठी २५० कर्मचारी कार्यरत आहेत. यासह आरोग्य विभागात १०० कर्मचारी आहेत. लसीकरण करणे, अँटिजेन तपासणी करणे आणि कोरोना केअर सेंटरमध्ये कार्यरत राहून बाधित रुग्णांना सुविधा पुरविणे ही कामे आरोग्य कर्मचारी करीत आहेत. यासह पाहणी आणि कारवाईची पथके कार्यान्वित केली आहेत. मात्र, त्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध नसतानाही कोरोनाला सामोरे जात जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे.
विमा कवच देणे गरजेचे
मागील एक वर्षात महापालिका कर्मचारी जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढा देत आहेत. असे असताना साधारण ५० ते ५५ जण कोरोना बाधित झाले होते. तर ३ ते ४ जणांचा मृत्यू झाला. यामुळे सध्या कार्यरत असलेल्या स्वच्छता, पाहणी पथक, आरोग्य आणि अत्यावश्यक कर्मचारी यांना सुरक्षा कवच देणे गरजेचे आहे. अद्याप सुरक्षा कवच व अन्य साधनांची कमतरता आहे.
असे आहेत कर्मचारी
९ पथक कारवाईसाठी, एका पथकात १० ते १५ कर्मचारी ३६ वसुली निरीक्षक
अंत्यविधीसाठीचे आठ जणांचे पथक १०० आरोग्य कर्मचारी
२५० कामाठी, स्वच्छता कामगार
या आहेत मागण्या
दररोज काम करताना मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीट द्यावी. सर्वांचे लसीकरण करून घ्यावे, गरज पडल्यास रेमडेसिविर इंजेक्शन मोफत द्यावे, १० टक्के इंजेक्शन साठा राखीव ठेवावा.