अभिलेखे व्यवस्थापनात गंगाखेड पोलिसांचे कार्य उल्लेखनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:20 AM2021-01-16T04:20:35+5:302021-01-16T04:20:35+5:30
गंगाखेड येथील पोलीस ठाण्याची २०२०-२१ या वर्षाची वार्षिक तपासणी नुकतीच पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाकडून करण्यात आली. यावेळी वरिष्ठांनी दिलेल्या ...
गंगाखेड येथील पोलीस ठाण्याची २०२०-२१ या वर्षाची वार्षिक तपासणी नुकतीच पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाकडून करण्यात आली. यावेळी वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशानुसार अभिलेखे, मद्देमाल याची व्यवस्थित मांडणी, रेकॉर्ड जतन करून योग्य पद्धतीने लेबलिंग करून ठेवल्याचे आढळून आले. मुद्देमालाच्या दर्शनी भागावर योग्य प्रकारचे टीकमार्क केल्याचे दिसून आले. पोलीस ठाण्याला असलेल्या भाग १ ते ५ मुद्देमालाची तपासणी केली. अभिलेखातील सी एक, सी दोन, सी तीन या अभिलेखातील गोपनीयतेचे अद्ययावतीकरण, त्याची व्यवस्थित नोंदी ठेवल्याचे तपासणी दरम्यान दिसून आले. याबद्दल पोलीस अधीक्षक जयंती मीना यांनी सहायक पोलीस उपनिरीक्षक बी. व्ही. धुमाळ यांना पाच हजार रुपये सन्मानपत्र, पोलीस जमादार उमाकांत जामकर, संतोष शिंदे यांना प्रत्येकी दहा हजार रुपये आणि सन्मानपत्र व पोलीस कर्मचारी अय्युब शेख, अनिल भराडे यांना प्रत्येकी पाच हजार रुपये व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कार्य केले म्हणून प्रोत्साहन बक्षीस मिळाल्याचे पोलीस जमादार उमाकांत जामकर यांनी सांगितले.