रेल्वेस्थानकावरील पादचारी पुलाचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:20 AM2021-01-16T04:20:15+5:302021-01-16T04:20:15+5:30
गंगाखेडचा वाढला धुळीचा त्रास परभणी : गंगाखेड रस्त्यावर रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी एका बाजूचा रस्ता खोदून ...
गंगाखेडचा वाढला धुळीचा त्रास
परभणी : गंगाखेड रस्त्यावर रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी एका बाजूचा रस्ता खोदून ठेवल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ वाढली आहे. दुचाकी वाहनधारकांना या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
बाजारपेठ भागात वाहतुकीची कोंडी
परभणी : शहरातील बाजारपेठ भागामध्ये अनेक वाहनधारक व वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. विरुद्ध मार्गाने वाहन चालविणे, नो पार्किंगच्या जागेत वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. पोलिसांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दुभाजकाची लांबी वाढविण्याची मागणी
परभणी : शहरातून जाणाऱ्या वसमत रस्त्यावरील दुभाजकाची लांबी दत्तधामपर्यंत वाढवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला होता. मात्र, या रस्त्यावर दुभाजक टाकल्याने अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे या दुभाजकाची लांबी दत्तधामपर्यंत वाढवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
जप्त केलेली वाहने तहसीलमध्ये पडून
परभणी : येथील तहसील प्रशासनाने वाहतूक करणारी अनेक वाहने जप्त केली आहेत. मात्र, मागील अनेक दिवसांपासून या वाहनांवर पुढील कारवाई झाली नाही. त्यामुळे ती तहसील कार्यालय परिसरात पडून आहेत. प्रशासनाने संबंधित वाहनधारकांवर तत्काळ कारवाई करून दंड वसूल करावा, अशी मागणी होत आहे.
घरकुलांची बांधकामे ठप्प
परभणी : वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने नागरिकांना अजूनही चढ्या दराने वाळूची खरेदी करावी लागत आहे. परिणामी शासनाच्या योजनेतील घरकुलांचे बांधकाम ठप्प पडले आहेत. घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून होत असताना प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.