पादचारी पुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:10 AM2020-12-28T04:10:05+5:302020-12-28T04:10:05+5:30

मास्क वापरण्यास नागरिकांची टाळाटाळ परभणी : शहरात मास्कचा वापर करण्यास नागरिक टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका ...

Work on the pedestrian bridge stalled | पादचारी पुलाचे काम रखडले

पादचारी पुलाचे काम रखडले

googlenewsNext

मास्क वापरण्यास नागरिकांची टाळाटाळ

परभणी : शहरात मास्कचा वापर करण्यास नागरिक टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. मध्यंतरी मनपा प्रशासनाने शहरात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरुद्ध मोहीम सुरू केली होती. मात्र, ही मोहीम आता ठप्प पडली आहे. त्यामुळे नागरिकही विनामास्क शहरात फिरत असून, मनपा प्रशासनाने पुन्हा मोहीम सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

गळती दुरुस्तीला लागेना मुहूर्त

परभणी : शहरात काही भागात जलवाहिनीला गळती लागली असून, दुरुस्ती केली जात नसल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. कारेगाव रोड भागात ही समस्या अधिक आहे. या भागात अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आहे. या भागातील पाईपलाईन जुनी झाली असून, ती दुरुस्त करताना प्रशासनाला अडचणी निर्माण होत आहेत. तेव्हा या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकावी, अशी मागणी होत आहे.

डाळिंबांची वाढली आवक

परभणी : शहरातील बाजारपेठेत डाळिंबांची आवक पुन्हा वाढली आहे. मागील आठवड्यात बाजारपेठेतील डाळिंब गायब झाले होते. आता पुन्हा परजिल्ह्यातून डाळिंब बाजारपेठेत दाखल झाले आहेत. आवक वाढली असली तरी डाळिंबाचे भाव मात्र वाढलेलेच आहेत.

वाळूघाटांची लिलावप्रक्रिया ठप्पच

परभणी : राज्य निवडणूक आयोगाने वाळूघाटांचे लिलाव करण्यासाठी परवानगी दिली असली तरी जिल्ह्यात अद्यापही ही प्रक्रिया सुरू झालेली नाही. सध्या वाळूचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून, खुल्या बाजारपेठेत वाळू मिळत नसल्याने बांधकामे ठप्प पडली आहेत. घरकुलांची बांधकामे तर ठप्पच आहेत. प्रशासनाने वाळूघाटांची लिलाव प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.

रनिंग ट्रॅक तयार करण्याची मागणी

परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरात अनेक जण सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येतात. मात्र, रनिंग ट्रॅक नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी रनिंग ट्रॅक उभारण्याच्या सूचना तत्कालीन क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या आहेत. मात्र, दोन वर्षे उलटूनही रनिंग ट्रॅक उभारण्याच्या हालचाली होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

Web Title: Work on the pedestrian bridge stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.